VIDEO :...अन् धोनीनं तिच्यासमोर टेकले गुडघे

By Admin | Updated: February 15, 2017 15:59 IST2017-02-15T15:58:33+5:302017-02-15T15:59:44+5:30

टीम इंडिया माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने कुणापुढे झुकत नाही असं म्हणतात. पण धोनी स्वतःच्या मुलीसमोर अक्षरशः गुडघे टेकावे लागले आहेत.

VIDEO: ... and Dhoni knees kneeling before him | VIDEO :...अन् धोनीनं तिच्यासमोर टेकले गुडघे

VIDEO :...अन् धोनीनं तिच्यासमोर टेकले गुडघे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 - टीम इंडिया माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने कुणापुढे झुकत नाही असं म्हणतात. पण धोनी स्वतःच्या मुलीसमोर अक्षरशः गुडघे टेकावे लागले आहेत. 
 
तुम्हाला माहितीच आहे ना, धोनीने टेस्ट मॅचमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता फक्त तो वन-डे आणि टी-20 सामन्यांसाठी खेळतो. इंग्लंडविरोधातील एकदिवसीय मालिकपूर्वी त्यांनी कॅप्टनपदाचाही राजीनामा दिला होता.  यामुळे धोनीकडे सध्या कुटुंबासाठी वेळच-वेळ आहे. 
 
यातही त्याच्याकडे मुलगी झिवासोबत खेळण्यासाठी बराच वेळ आहे. मंगळवारी महेंद्र सिंह धोनीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, यात धोनी मुलगी झिवासोबत खेळत असताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये झिवा गुडघ्यांवर रांगत आहे आणि धोनीदेखील तशाच पद्धतीने रांगत तिचा पाठलाग करत आहे. यासाठीच त्यानं मुलीसमोर गुडघे टेकले होते. तुम्हाला काय वाटलं?
 
इंस्टाग्रामवर धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या धोनी कुटुंबीयांसोबत डेहरादून येथे भ्रमंती करत आहे. 
 

Web Title: VIDEO: ... and Dhoni knees kneeling before him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.