VIDEO: 'आयला रे आयला...' ऑलिम्पिकमध्ये चक्क अक्षयच्या गाण्यावर परफॉर्मन्स
By Admin | Updated: August 16, 2016 16:57 IST2016-08-16T16:43:11+5:302016-08-16T16:57:22+5:30
ऑलिम्पिकमध्येही बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा फिव्हर असल्याचं दिसत आहे. कारण मेक्सिकन स्विमर्सनी चक्क अक्षय कुमारच्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे.

VIDEO: 'आयला रे आयला...' ऑलिम्पिकमध्ये चक्क अक्षयच्या गाण्यावर परफॉर्मन्स
>- ऑनलाइन लोकमत
रिओ दी जानेरो, दि. 16 - बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार सध्या रुस्तम चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनेकदा चित्रपट रिलीज होण्याआधी आणि नंतर चर्चेत राहण्यासाठी अभिनेते अनेक फंडे वापरतात. पण अक्षय कुमारला याची अजिबात गरज नाही. कारण सध्या देशभरात चर्चा होत असलेल्या ऑलिम्पिकमध्येही अक्षय कुमारचा फिव्हर असल्याचं दिसत आहे. कारण मेक्सिकन स्विमर्सनी चक्क अक्षय कुमारच्या गाण्यावर परफॉर्मन्स दिला आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये मेक्सिकोच्या दोन जलतरणपटूंनी सिंक्रोनाईज्ड स्विमिंग परफॉर्मन्स दिला. यावेळी त्यांनी अक्षय कुमारच्या खट्टा मीठा चित्रपटातील ‘आयला रे आयला’ गाणं निवडलं. 15 ऑगस्टला त्यांनी हा परफॉर्मन्स दिला. करेम अचाच आणि नुरिया दिओसदादो अशी या खेळाडूंची नावं आहेत.
‘आयला रे आयला’ या गाण्यावर दोघींनी स्विमिंग पूलमध्येच कसरती केल्या. अक्षय कुमारच्या 'खट्टा मीठा' चित्रपटातील हे गाणं आहे. दलेर मेहंदी आणि कल्पना पटौरी यांनी हे गाणं गायलं असून प्रीतमने संगीतबद्ध केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही आयला म्हणल्याशिवाय राहणार नाही.
Mexican #SynchronisedSwimming team dancing to 'Aila Re Aila'