विदर्भाचा दुसरा विजय

By Admin | Updated: February 28, 2017 18:49 IST2017-02-28T18:49:09+5:302017-02-28T18:49:09+5:30

सलामीवीर जितेश शर्मा व कर्णधार फैज फझल यांनी वैयक्तिकअर्धशतके झळकावित सलामीला केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर विदर्भाने विजय

Vidarbha's second win | विदर्भाचा दुसरा विजय

विदर्भाचा दुसरा विजय

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 -  सलामीवीर जितेश शर्मा व कर्णधार फैज फझल यांनी वैयक्तिकअर्धशतके झळकावित सलामीला केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे करंडक वन-डे क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटाच्या लढतीत मंगळवारी
रेल्वेचा ८ गडी राखून पराभव केला. सलामी लढतीत पराभव स्वीकारणा-या विदर्भाचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे.
विदर्भाने रेल्वेचा डाव ४१.४ षटकांत १९९ धावांत गुंडळाला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४५.२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या.
विदर्भातर्फे जितेश (८४) व फझल (५३) यांनी सलामीला ११७ धावांची भागीदारी केली. जितेशने ११४ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व ३ षटकार ठोकले तर फझलने ९५ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार व १ षटकार लगावला.
त्याआधी, दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मनजीत सिंगच्या (५४) अर्धशतकी खेळीनंतरही रेल्वेचा डाव ४१.४ षटकांत १९९ धावांत संपुष्टात आला. मनजीतने हितेश कदम (नाबाद १२) याच्यासोबत अखेरच्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. सलामीवीर असद पठाणने ४६ धावांची खेळी केली. विदर्भातर्फे अक्षय कर्णेवारने ३ तर रविकुमार ठाकूरने दोन बळी घेतले. 
 
धावफलक...
रेल्वे :- एयुके पठाण झे. वानखेडे गो. आर.डी. ठाकूर ४६, एस.पी. वाकसकर पायचित गो. कर्णेवार ००, प्रथम सिंग झे. शर्मा गो. आर.डी. ठाकूर १०, ए.एन.घोष झे. शर्मा गो. वखरे ०७, एम. रावत पायचित गो. कर्णेवार ११, के.व्ही. शर्मा झे. व गो. कर्णेवार ११, आशिष यादव झे. शर्मा गो. चौरसिया २३, ए.सी.पी. मिश्रा धावबाद १४, अनुरित सिंग धावबाद ००, मंजित सिंग त्रि.
गो. वाय.एस. ठाकूर ५४, एच.जी. कदम नाबाद १२. अवांतर (११). एकूण ४१.४ षटकांत सर्वबाद १९९. बाद क्रम : १-१, २-३७, ३-६४, ४-६८, ५-८८, ६-९२, ७-१३३, ८-१३३, ९-१३४, १०-१९९. गोलंदाजी : आर.एन. गुरबानी ५-०-२१-०, अक्षय
कर्णेवार ९-१-३२-३, वाय.एस. ठाकूर ७.४-०-२९-१, आर.डी. ठाकूर ९-१-४७-२, अक्षय वखरे ९-०-५७-१, ए.व्ही. चौरसिया २-०-९-१.
विदर्भ :- फैझ फझल त्रि. गो. कदम ५३, जितेश शर्मा झे. वाकसकर गो. आशिष यादव ८४, गणेश सतीश नाबाद ३६, अंबाती रायडू नाबाद १९. अवांतर (८). एकूण ४५.२ षटकांत २ बाद २००. बाद क्रम : १-११७, २-१६८. गोलंदाजी : अनुरित सिंग
६-१-३०-०, ए.सी.पी. मिश्रा ८-१-३३-०, मंजित सिंग ५.२-१-२०-०, के.व्ही. शर्मा ९-०-३७-०, आशिष यादव १०-०-३९-१, एच.जी. कदम ७-०-४१-१. 
 

Web Title: Vidarbha's second win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.