विदर्भ चॅम्पियन

By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:34+5:302016-02-29T02:14:34+5:30

अंधांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

Vidarbha champion | विदर्भ चॅम्पियन

विदर्भ चॅम्पियन

धांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा
नागपूर : विदर्भाने जळगावचा ७२ धावांनी पराभव करीत अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. शरदचंद्र कला-वाणिज्य महाविद्यालय बुटीबोरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि सुजन बहुउद्देशीय विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने ८ बाद १६५ धावांची दमदार मजल मारली. अनिल बेलसरेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना जळगाव संघाचा डाव ९३ धावांत रोखल्या गेला. त्याआधी, उपांत्य फेरीत जळगाव संघाने अकोला संघाचा ७ गडी राखून पराभव केला तर विदर्भाने पुणे संघाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवला.
माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे सदस्य विजय चिटके होते. यावेळी लॉयन्स इंटरनॅशनलचे विजय पालिवाल, राजेश अडेचा, सुजन विकास संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कांबळे, एससीएसीच्या प्राचार्य डॉ. अर्चना लोबो, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद जोशी, राजेश हाडके, उमेश पाटील, शैलेश राऊळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha champion