ऑक्सफर्ड मरिन, गावणे स्ट्रायकर्सचे विजय
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:16+5:302015-05-05T01:21:16+5:30
रॉयल टी-२० क्रिकेट : नित्यानंद, लाईटनिंग स्टार्झचा पराभव

ऑक्सफर्ड मरिन, गावणे स्ट्रायकर्सचे विजय
र यल टी-२० क्रिकेट : नित्यानंद, लाईटनिंग स्टार्झचा पराभवपणजी : वेलिंग क्रिकेटर्सने आयोजित केलेल्या रॉयल टी-२० सिझनबॉल क्रिकेट स्पर्धेत ऑक्सफर्ड मरिन आणि गावणे स्ट्रायकर्स यांनी विजय नोंदवले. त्यांनी अनुक्रमे नित्यानंद स्पोर्ट्स क्लब आणि लाईटनिंग स्टार्झचा पराभव केला. ऑक्सफर्डचा संकल्प पेडणेकर व गावणे स्ट्रायकर्सचा सिद्धेश नाईक सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. पहिल्या सामन्यात ऑक्सफर्ड मरिन संघाने १९ षटकांत सर्वबाद १३८ धावा केल्या. त्यांच्या दामोदर भटने ४३ तर सनी काणेकरने २२ धावांचे योगदान दिले. नित्यानंदकडून टेक बहादूर आणि शिशिर दिवकर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, नित्यानंद स्पोर्ट्स क्लब १९.१ षटकांत १२२ धावांवर गारद झाला. त्यांच्या प्रमोद नाईकने सर्वाधिक ३४ धावा केल्या. वैभव कडकडेने १९ धावांचे योगदान दिले. ऑक्सफर्डकडून संकल्प पेडणेकरने ३ तर मुक्तार काद्रीने २ गडी बाद केले. हा सामना ऑक्सफर्डने १६ धावांनी जिंकला.दुसर्या सामन्यात, गावणे स्ट्रायकर्सने १९.४ षटकांत सर्वबाद १५५ धावा केल्या. यामध्ये सिद्धेश नाईकने अर्धशतक (५२) झळकावले. सुशांत गोवेकरने २० धावांचे योगदान दिले. लाईटनिंग स्टार्झकडून परशुराम आणि साहिल यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. प्रत्युत्तरात, लाईटनिंग स्टार्झ संघाने २० षटकांत ९ बाद १२६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांच्या उमराज आणि राजेश जोशी यांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. गावणे संघाकडून रघुवीर लोटलीकरने ३ तर सिद्धू वेरेकरने २ गडी बाद केले. हा सामना गावणे स्ट्रायकर्सने २९ धावांनी जिंकला.(क्रीडा प्रतिनिधी)