बंगळुरूचा डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबवर विजय
By Admin | Updated: May 19, 2016 00:57 IST2016-05-19T00:57:56+5:302016-05-19T00:57:56+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं डकवर्थ लुईस नियमानुसार किंग्ज इलेव्हन पंजाबवर 82 धावांनी विजय मिळवला

बंगळुरूचा डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाबवर विजय
ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. 19- आयपीएलच्या नवव्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं डकवर्थ लुईस नियमानुसार किंग्ज इलेव्हन पंजाबवर 82 धावांनी विजय मिळवला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 120 धावा करता आल्यात. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून कॅप्टन विजय आणि साहानं संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूनं पंजाब समोर १२१ धावांचे आव्हान ठेवले होते. सामना सुरु होण्यापुर्वी पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यास विलंब झाला. त्यामुळे सामना प्रत्येकी १५ षटकाचा खेळवण्यात आला. बेंगळुरुने काहली-गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर १५ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांचा डोंगर उभा केला. गेल आणि कोहलीने ११ षटकात १४७ धावांची सलामी दिली. गेलने ३२ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ षटकार आणि ३ चौकार लगावले. कोहलीने आज शानदार फलंदाजी करताना ५० चेंडूत शतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे चौथे शतक होय. ११३ धावांची खेळी करताना कोहलीने १२ चौकार आणि ८ षटकारांची बरसात केली. एबी भोपळाही न फोडता तंबूत परतला. के राहुलने १६ धावांचे योगदान दिले.