ओशेल बॉयजचा विजय

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:34+5:302015-07-15T23:12:34+5:30

कामुर्ली : अटीतटीच्या लढतीत खैराट बॉयजचा ३-२ ने पराभव करीत ओशेल बॉयज संघाने शानदार विजय मिळवला. मुड्डावाडा-कामुर्ली येथील के. के. स्पोर्ट्स व कल्चरल क्लब आयोजित चौथ्या अंतरवॉर्ड फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील ही लढत वागाळी येथील काजरो मैदानावर झाली.

The victory of the ochele boy | ओशेल बॉयजचा विजय

ओशेल बॉयजचा विजय

मुर्ली : अटीतटीच्या लढतीत खैराट बॉयजचा ३-२ ने पराभव करीत ओशेल बॉयज संघाने शानदार विजय मिळवला. मुड्डावाडा-कामुर्ली येथील के. के. स्पोर्ट्स व कल्चरल क्लब आयोजित चौथ्या अंतरवॉर्ड फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील ही लढत वागाळी येथील काजरो मैदानावर झाली.
ओशेल बॉयजच्या अँथनी डिसोझाने एक, तर हर्षल कळंगुटकरने दोन गोल केले. पराभूत संघाकडून अनिकेत मोरजकर व नितेश गुणाजी यांनी प्रत्येकी एक गोल केला. रविवारी (दि. १९) चार वाजता कामुर्ली बॉयज आणि खैराट बॉयज, पाच वाजता के.के. वि. ओशेल बॉयज यांच्यात लढत होईल.
फोटो: ओशेल बॉयज विरुद्ध खैराट बॉयज सामन्यातील एक क्षण. (जयेश नाईक)

Web Title: The victory of the ochele boy