ज्योती विद्यालयाची विजयी परंपरा कायम जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

By Admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:14+5:302014-08-27T21:30:14+5:30

अकोला : जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदादेखील ज्योती विद्यालयाने आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगणावर स्पर्धेतील अंतिम सामना झाला. १७ वर्षाआतील मुलींच्या गटात ज्योती विद्यालयाने भारत विद्यालयाचा २५-९, २५-१५ असा पराभव केला.

Victory of Jyoti Vidyalaya, District Level School Volleyball Tournament | ज्योती विद्यालयाची विजयी परंपरा कायम जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

ज्योती विद्यालयाची विजयी परंपरा कायम जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा

ोला : जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत यंदादेखील ज्योती विद्यालयाने आपली विजेतेपदाची परंपरा कायम राखली. बुधवार, २७ ऑगस्ट रोजी वसंत देसाई क्रीडांगणावर स्पर्धेतील अंतिम सामना झाला. १७ वर्षाआतील मुलींच्या गटात ज्योती विद्यालयाने भारत विद्यालयाचा २५-९, २५-१५ असा पराभव केला.
पहिला उपान्त्य सामना भारत विद्यालय व स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड संघात झाला. भारत विद्यालयाने हा सामना २५-८, २५-१२ असा जिंकला. दुसरा सामना ज्योती विद्यालय व हॅपी अवर्स स्कूल संघात झाला. ज्योती विद्यालयाने हा सामना २५-२, २५-७ असा एकतर्फी जिंकला. अंतिम सामना ज्योती विद्यालय व भारत विद्यालयात झाला. प्रेक्षणीय ठरलेला हा सामना ज्योती विद्यालयाने जिंकून विभागीय स्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.
१७ वर्षाआतील मुलांच्या गटातील स्पर्धेला आज प्रारंभ करण्यात आला. प्राथमिक फेरी पूर्ण झाली. स्पर्धेच्या उपान्त्यफेरीला सुरुवात झाली. पहिला उपान्त्य सामना गुरुनानक विद्यालय व स्कूल ऑफ स्कॉलर्स संघात झाला. गुरुनानक विद्यालयाने २५-२०, २५-७ असा विजय मिळवून अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला. दुसरा उपान्त्य सामना व अंतिम सामना गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पंच म्हणून प्रशांत ठाकरे, अमोल ठाकरे, सुरज पाटील हे काम पाहत आहेत.
(क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन : जिल्हा स्तर शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील सामन्यांमधील रोमांचक क्षण.
-२८सीटीसीएल०२ व २८सीटीसीएल०३
...

Web Title: Victory of Jyoti Vidyalaya, District Level School Volleyball Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.