हळदोणा, सूकूर, हातवाडा यांचे विजय
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30
जीएफडीसी रायझिंग स्टार आंतरकेंद्र लीग स्पर्धा

हळदोणा, सूकूर, हातवाडा यांचे विजय
ज एफडीसी रायझिंग स्टार आंतरकेंद्र लीग स्पर्धा पणजी : गोवा फुटबॉल विकास महामंडळ (जीएफडीसी) आणि वोडाफोन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसर्या सत्रातील रायझिंग स्टार आंतरकेंद्र फुटबॉल लीग स्पर्धेत 13 वर्षांखालील मुलांच्या गटात हळदोणा रेड, सकूर सी आणि हातवाडा यांनी विजय नोंदवले, तर 10 वर्षांखालील गटात सुकूर ‘अ’, हातवाडा आणि जे. जे. बॉइज संघांनी विजयी सलामी दिली. हळदोणा रेड संघाने हळदोणा ग्रीन संघावर 3-0 ने मात केली. या सामन्यात दोन गोल नोंदवणारा आर्यन पवार हा सामनावीर ठरला. त्याने 6 व्या आणि 36 व्या मिनिटाला गोल नोंदवले. नरेंद्र नाईकने 37 व्या मिनिटाला गोल नोंदवला. सुकूर मैदानावरील सामन्यात सुकूर सी संघाने सुकूर डी संघाचा 2-0 गोलनी पराभव केला. त्यांच्या शाश्वत कामत आणि लेस्टॉन रॉड्रिग्सने गोल नोंदवले. लुईसची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. वाळपई मैदानावरील सामन्यात हातवाडा आणि वाळपई यांच्यातील सामना बरोबरीवर राहिला. अन्य सामन्यात, सत्याहरीने शार्पशूटर्सचा 1-0 ने पराभव केला. गोल नोंदवणारा शंतनू सामनावीर ठरला.