गुजरातचा विजय

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:25+5:302015-02-08T00:19:25+5:30

Victory of Gujarat | गुजरातचा विजय

गुजरातचा विजय

>अहमदाबाद : गुजरातने हरियाणाला दुसर्‍या डावात स्वस्तात गारद करीत रणजी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी ११५ धावांचे सोपे लक्ष्य पूर्ण करीत ९ विकेटने विजय मिळवला़ गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (*६२) आणि चिराग गांधी (*४२) यांनी विजय मिळवून दिला़
हिमाचलचा धाव डोंगर
हैदराबाद : कर्णधार बिपुल शर्मा (१७६) याच्या शानदार खेळीच्या जोरावर हिमाचलप्रदेशने हैदराबादविरुद्ध दुसर्‍या दिवशी ५११ धावांचे विशाल स्कोअर उभे केले़ शर्माने पारस डोगरा (१३७) याच्यासोबत सहाव्या गड्यासाठी २४९ धावा जोडल्या़
मंगलोरकरचे सात बळी
बडोदरा: वेगवान गोलंदाज सागर मंगलोरकरच्या सात बळींच्या जोरावर बडोद्याने रणजी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी तामिळनाडूला १८८ धावात गारद केले़ बडोद्याने पहिल्या डावात १४९ केल्या होत्या़ तर दुसर्‍या डावात बडोद्याने ३ बाद ७३ धावा केल्या आहेत़

Web Title: Victory of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.