बांगलादेशाचा विजय

By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:02+5:302015-02-18T23:54:02+5:30

बांगलादेश १०५ धावांनी विजयी

The victory of Bangladesh | बांगलादेशाचा विजय

बांगलादेशाचा विजय

ंगलादेश १०५ धावांनी विजयी
अफगाणिस्तानला अनुभव नडला : शाकीब, मुशफिकर यांची अर्धशतके
कॅनबेरा : शाकीब अल् हसन आणि मुशफिकर रहीम यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशाने विश्वचषकात पदार्पण करणार्‍या अफगाणिस्तानला बुधवारी १०५ धावांनी पराभूत केले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणार्‍या बांगलादेश संघाने २६७ धावा ठोकल्या. एक वेळ त्यांचीही ४ बाद ११९ अशी दयनीय अवस्था होती; पण शाकीब ६३ आणि मुशफिकर ७१ यांनी पाचव्या गड्यासाठी ११४ धावा ठोकून संघाला तारले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ ४२.५ षटकांत १६२ धावांत बाद झाला. समीउल्लाह शेनवारी ४२ व कर्णधार मोहंमद नबी ४४ हेच बांगलादेशाच्या मार्‍याला समर्थपणे तोंड देऊ शकले. बांगलादेशासाठी मुशर्रफ मुर्तझाने तीन आणि शाकीबने दोन गडी बाद केले.
बांगलादेशाच्या आणखी धावा झाल्या असत्या; पण शाकीब आणि रहीम बाद होताच अखेरचे ५ गडी केवळ ३४ धावांची भर घालून बाद झाले. त्याआधी मीरवैझ अश्रफने बांगलादेशाला बॅकफुटवर आणले. त्याने इनामुल हक् २९ आणि तमीम इक्बाल १९ यांना झटपट बाद केले. सौम्या सरकार २८, महमदुल्लाह २३ यांना शापूर जरदान याने बाद केले. नंतर शाकीबने २७वे अर्धशतक नोंदविले; शिवाय ४ हजार धावा करणारा बांगलादेशाचा पहिला खेळाडू बनला. रहीमने ५६ चेंडूंवर ६ चौैकार व एका षटकारासह १९ वे वन डे अर्धशतक गाठले.
अफगाणिस्तानला पुरेसा अनुभव नसल्याने ३ धावांत त्यांचे ३ गडी तंबूत परतले. नवरोज मंगल २७ आणि शेनवारी ४२ यांनी मोठी भागीदारी केली. बांगलादेशाला २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तसेच अफगाणिस्तानला २२ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.(वृत्तसंस्था)
०००

Web Title: The victory of Bangladesh