द. आफ्रिकेचा विजय, प्रेक्षकांनी मैदानात फेकल्या बाटल्या
By Admin | Updated: October 5, 2015 23:02 IST2015-10-05T22:22:20+5:302015-10-05T23:02:17+5:30
टी-ट्वेन्टी सामन्यात द.आफ्रिकेने सहा गडी राखून भारतावर विजय मिऴवला. यामुळे आता भारताच्या दुस-या पराभवामुळे द.आफ्रिकेने तीन सामन्याच्या टी-ट्वेन्टी मालिकेवर आपले नाव निश्चित केले आहे.

द. आफ्रिकेचा विजय, प्रेक्षकांनी मैदानात फेकल्या बाटल्या
ऑनलाइन लोकमत
कटक , दि. ५ - टी-ट्वेन्टी सामन्यात द.आफ्रिकेने सहा गडी राखून भारतावर विजय मिऴवला. यामुळे आता भारताच्या दुस-या पराभवामुळे द.आफ्रिकेने तीन सामन्याच्या टी-ट्वेन्टी मालिकेवर आपले नाव निश्चित केले आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय टीमच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा समोर दिसणा-या पराभवामुळे संतप्त भारतीय प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यामुळे पंचांनी दोनवेळा खेळ अर्धावरच थांबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळानंतर सामना सुरु करण्यात आला. मात्र तोपर्यंत नाराज प्रेक्षकांनी घरी जाणे पसंत केले.
जेपी ड्युमिनी आणि एबी डिव्हिलर्सच्या जोरावर भारतीय टीमने दिलेले ९३ धावांचे आव्हान द. आफ्रिकेने मोडून काढले. जेपी ड्युमिनीने सर्वाधिक नाबाद ३० धावा केल्या, तर एबी डिव्हिलर्सने १९ धावा केल्या. हाशिम आमला ०२, डू प्लेसिस १६ धावा केल्या.
त्यापुर्वी, भारतीय फलदांजानी खराब फटकेबाजी करत अवघ्या ९२ धावा केल्या. यामध्ये रोहित शर्मा(२२) आणि महत्वपुर्ण खेळी करणारा विराट (०१) धावबाद झाले. तर रैना(२२), धवन(११), धोनी(०५), रायडू(०), पटेल(०९), हरभजन(०) यांनीही निराश केले. अश्विन ने ११ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजाने तो सार्थ ठरवला, दक्षिण आफ्रिकातर्फे अॅल्बी मोर्केल ०३, इम्रान ताहिर ०२, ख्रिस मॉरिस ०२ आणि कॅगिसो रबादा ०१ बळी मिळवले.