व्हीएचए हॉकी
By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:25+5:302014-12-18T22:39:25+5:30
व्हीएचए शालेय हॉकी स्पर्धा

व्हीएचए हॉकी
व हीएचए शालेय हॉकी स्पर्धासेंट जॉन्सचा आरबीजीजीवर दिमाखदार विजयनागपूर : राज सोमलवार आणि मुकुल सोमलवार यांच्या प्रत्येकी दोन गोलमुळे सेंट जॉन्स स्कूलने विदर्भ हॉकी संघटनेद्वारा आयोजित आंतर शालेय हॉकी स्पर्धेत गुरुवारी आरबीजीजी संघावर ६-० ने दिमाखदार विजय नोंदविला.या सामन्यावर सेंट जॉन्सचे वर्चस्व होते. चौथ्या मिनिटाला आबिद शेख याने संघाचे खाते उघडले. हाशिम रझा याने २२ व्या मिनिटाला गोल नोंदवित आघाडी दुप्पट केली. राज सोमलवार याने तिसरा गोल २७ व्या मिनिटाला केला. नंतर मुकुलने २९ आणि ३१ व्या मिनिटाला लागोपाठ गोल केले. राजने ३४ व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला.दुसऱ्या सामन्यात जाईबाई चौधरी हायस्कूलने बलाढ्य एसएफएसला २-२ असे रोखले. या सामन्यात २२ व्या मिनिटाला मेवेल रॉड्रिग्जने सुरेख गोल नोंदवित एसएफएसला आघाडी मिळवून दिली. त्याने ३९ व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल केला. जाईबाई संघाकडून ४६ व्या मिनिटाला प्रशिक्षक गवई याने पहिला तर तीन मिनिटानंतर राहुल भगत याने दुसरा गोल नोंदवित बरोबरी साधून दिली. यानंतर उभय संघांनी आघाडी घेण्यासाठी प्रयत्न केले पण त्यात उभयतांना यश आले नाही.उद्या शुक्रवारी सकाळी ८.३० पासून स्कूल ऑफ स्कॉलर्सविरुद्ध स्वामीनारायण विद्यालय, साऊथ पॉईंटविरुद्ध एमएके आझाद स्कूल, सेंट ॲन्थोनीविरुद्ध नागपूर रेसिडेन्शियल स्कूल आणि सेंट जॉन्सविरुद्ध सेंट झेव्हियर्स स्कूल यांच्यात सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)