व्हीएचए कॉलेज हॉकी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
व्हीएचए आंतर महाविद्यालयीन हॉकी

व्हीएचए कॉलेज हॉकी
व हीएचए आंतर महाविद्यालयीन हॉकीडॉ. आंबेडकर कॉलेजची विजयी आगेकूचनागपूर : शाहीद शेखने केलेल्या तीन गोलच्या जोरावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने तिसऱ्या साखळी सामन्यात सिंधू महाविद्यालयाला पराभूत करून व्हीएचए कॉलेज डिव्हिजन हॉकी स्पर्धेत विजयी मोहीम कायम राखली. जी.एस. कॉलेजने धनवटे नॅशनल कॉलेजला नमविले. विदर्भ हॉकी संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधू महाविद्यालयाविरुद्ध डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या शाहीद शेखने पाचव्या मिनिटाला गोल नोंदवित संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत आघाडी कायम होती. मध्यंतरानंतरच्या खेळातही सिंधू महाविद्यालयाचे खेळाडू बरोबरी साधण्याच्या आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे खेळाडू आघाडी घेण्याच्या प्रयत्नात होते. परंतु,कोणालाही गोल नोदविणे शक्य झाले नाही. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या शाहीद शेखने ४७ व ४९ व्या मिनिटाला गोल करून विजय प्राप्त केला . दुसऱ्या सामन्यात जी.एस. कॉलेजने धनवटे नॅशनल कॉलेजचा ५-० अशा गोलफरकाने धुव्वा उडविला. विजयी संघातील पंकज शाहूने ९ व २५ आणि शुभम सोखेने १२ व्या मिनिटाला गोल करून संघाला मध्यंतरापर्यंत ३-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर राहुल कोरीने ३२ व पंकज शाहूने ४१ व्या मिनिटाला गोल केले.(क्रीडा प्रतिनिधी)