व्हीएचए कॉलेज हॉकी

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:37+5:302015-02-11T23:19:37+5:30

व्हीएचए आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा

VHA College Hockey | व्हीएचए कॉलेज हॉकी

व्हीएचए कॉलेज हॉकी

हीएचए आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा
सिंधू महाविद्यालयाचा दिमाखदार विजय
नागपर: फेरियो इमान्यूएलने नोंदविलेल्या चार गोलच्या बळावर सिंधू महाविद्यालयाने धनवटे नॅशनल कॉलेजला ७-० ने नमवीत विदर्भ हॉकी संघटनेतर्फे आयोजित व्हीएचए आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत दिमाखदार विजय नोंदविला.
अमरावती मार्गावरील व्हीएचए मैदानावरील लढतीत सिंधू महाविद्यालयाकडून सहाव्या मिनिटाला फेरियो इमान्यूएलने संघाचे खाते उघडले. दोन मिनिटानंतर विनय महतोने गोल केला.
यानंतर पाच मिनिटांच्या खेळात तीन गोल झाले. रक्षित सांगोळेने १३, इमान्यूएलने १५ आणि विनय महतोने १७ व्या मिनिटाला गोल करताच मध्यंतरापर्यंत संघाकडे ५-० अशी भक्कम आघाडी होती.
मध्यंतरानंतर धनवटे नॅशनल कॉलेजच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले; परंतु कुणालाही गोल करण्यात यश आले नाही. सिंधू महाविद्यालयाकडून इमान्यूएलनेे पुन्हा २७ व ३५ व्या मिनिटाला गोल करताच सिंधू संघाचा ७-० विजय साकार झाला. उद्या गुरुवारी दीनानाथ कनिष्ठ महाविद्यालयविरुद्ध एसएफएस कॉलेज हा सामना सकाळी ९.३० पासून तसेच जी. एस. कॉलेजविरुद्ध हिस्लॉप कॉलेज हा सामना सकाळी १०.३० पासून खेळविण्यात येईल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: VHA College Hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.