पहिल्याच दिवशी ऑसींची ‘हय़ुज’ फटकेबाजी
By Admin | Updated: December 10, 2014 01:00 IST2014-12-10T01:00:17+5:302014-12-10T01:00:17+5:30
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डेव्हिड वॉर्नरच्या (145) धमाकेदार शतकाच्या बळावर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 6 बाद 354 धावांची मजल मारली आहे.

पहिल्याच दिवशी ऑसींची ‘हय़ुज’ फटकेबाजी
शोकाकुल वातावरणात धमाकेदार सुरुवात : दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 354 धावा; वॉर्नरच्या 145 धावा
अॅडिलेड : फलंदाज फिलिप हय़ुज याच्या निधनानंतर शोकाकुल वातावरणात मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डेव्हिड वॉर्नरच्या (145) धमाकेदार शतकाच्या बळावर भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 6 बाद 354 धावांची मजल मारली आहे.
हय़ुजला o्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या या कसोटीत मानसिक दबावाखाली ऑस्ट्रेलियन संघ मायकल क्लार्क याच्या नेतृत्वाखाली मैदानात मंगळवारी उतरला. क्लार्कने नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि खेळाडूंनी जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ सपंला त्या वेळी ऑस्ट्रेलियाने 89.2 षटकांत 6 विकेटच्या मोबदल्यात 354 धावा केल्या. दुस:या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने 145 धावांची जबरदस्त शतकी खेळी केली, तर कर्णधार मायकल क्लार्क 6क् धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला स्टीव्हन स्मिथ 72 धावांवर खेळत आहे. दिवसअखेर बॅड्र हॅडीनला भारतीय गोलंदाज मोहंमद शमीने बाद केले. शमीने त्याला खाते उघडण्याची संधी दिलीच नाही. भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. शमीने 17.2 षटकांत 83 धावा देऊन 2 विकेट घेतल्या, तर वरुण अॅरोनने 17 षटकांत 95 धावा देऊन 2 विकेट घेतल्या. ईशांत शर्माने 2क् षटकांत 56 धावा देऊन एक, तर कर्ण शर्माने 23 षटकांत 89 धावा देऊन एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट सलामीवीर क्रिस रॉजर्सच्या रूपात पडली. रॉजर्सला ईशांत शर्माने धवलकरवी झेलबाद केले. मात्र, वॉर्नरने एक बाजू लावून धरत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने 163 चेंडूंत 19 चौकार लावून 145धावा चोपल्या. वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी रॉजरसह 5क् आणि तिस:या विकेटसाठी स्मिथसह 52 धावांची भागीदारी केली. चहापानापूर्वी शेवटच्या षटकांत वॉर्नर व स्मिथने धावांची गती वाढवली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने 13क् चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 72 धावा केल्या. त्याने मिशल मार्शसह चौथ्या विकेटसाठी 87 धावांची संयमी भागीदारी केली. मार्शने 87 चेंडूंत 5 चौकार ठोकून 41 धावांची उपयुक्त खेळी केली. वरुणने ही जोडी तोडली. त्याने विराट कोहलीकरवी मार्शला झेलबाद करून तंबूत पाठवले.
सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती; परंतु पहिल्या कसोटीत त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. वॉर्नरने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने पहिल्या चेंडूपासून 1क्क् धावांर्पयत 14 चौकारांची आतषबाजी केली. कसोटीत पदार्पण करणा:या कर्णने वॉर्नरला बाद केले; परंतु
तोर्पयत भारताचे फार नुकसान झाले होते. धावफलकावर 258 धावा असताना वॉर्नर तिस:या विकेटच्या रूपात बाद झाला.
प्रदीर्घ कालावधीनंतर मैदानात उतरलेल्या शेन वॉटसनने 33 चेंडूंत 3 चौकार लगावून 14 धावा केल्या. त्याला वरुणने बाद केले. सातव्या क्रमांकावर आलेल्या नाथन लिऑनचा शमीने त्रिफळा उडविला, तर हॅडीनलाही त्याने शून्यावर बाद केले. ऑस्ट्रेलियाचे आणखी 4 फलंदाज खेळायचे बाकी असून, स्मिथ नाबाद 72 धावांसह खेळपट्टीवर तग
धरून आहे. (वृत्तसंस्था)
वॉर्नर : द बेस्ट ओपनर!
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने मंगळवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. भारताविरुद्ध शतक झळकावून डेव्हिडने ऑस्ट्रेलियाचा 1948चा अपराजित संघ सदस्य असलेल्या डॉन ब्रॅडमन आणि नील हार्वे यांच्या यादीत समावेश केला. तसेच, 2क्14 मधील सर्वाेत्कृष्ट ‘ओपनर’चा मानही त्याने पटकावला. वॉर्नरने आतार्पयत 73.76च्या सरासरीने 959 धावा केल्या आहेत; ज्यात 6 शतकांचा समावेश आहे.
959 धावा. 2क्14मध्ये श्रीलंकेच्या कुशल सिल्वानंतर (769) सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर.
24 वर्षानंतर भारतीय फिरकीपटूने उपखंडाबाहेर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कर्ण शर्माला ही संधी मिळाली. याआधी अनिल कुंबळे याने 199क्मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते.
5क्.4क्ही वॉर्नरची फलंदाजीची सरासरी आहे.5क्हून अधिक सरासरीने 2क्क्क् धावा करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पाचवा फलंदाज आहे.
5क्धावांची भागीदारी. क्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 2क्14मध्ये आतार्पयत पाचहून अधिक वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.
145 धावा काढणा:या वॉर्नरची ही सर्वाेत्कृष्ट सलामी खेळी होती. गेल्या 1क् डावांतील त्याचे हे पाचवे शतक. गेल्या 3क् वर्षात ऑस्ट्रेलियन सलामीवीराने केलेली ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या होती.
135एवढा स्ट्राइक रेट वॉर्नरने वरुण अॅरोन आणि मोहंमद शमीविरुद्ध ठेवला होता. या दोघांविरुद्ध त्याने 57 चेंडूंत 77 धावा केल्या.
86.9क्च्या सरासरीने
शतक पूर्ण करणारा वॉर्नर. गेल्या दहा डावांतील त्याचा हा सर्वोच्च दुसरा स्ट्राइक रेट आहे. या यादीत अॅडम गिलािस्ट (96.6) पहिला, तर डेव्हिडनंतर भारताच्या वीरेंद्र सेहवागचा (83.5क्) समावेश आहे.
कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी : वॉर्नर
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत 145 धावांची ही खेळी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी असून आयुष्यभर ती स्मरणात ठेवीन, असे मत डेविड वॉर्नर याने व्यक्त केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वॉर्नर म्हणाला, ‘‘आशा करतो, की मी भविष्यात आणखी शतक करण्यात यशस्वी होईन; परंतु आजची खेळी नेहमी स्मरणात राहील. संपूर्ण डावात मला सतत असे वाटत होते, की हय़ुज दुस:या बाजूला माङयासह खेळत आहे.’’शतकाचा आनंद साजरा न करण्याचे ठरवले होते; परंतु हय़ुजला मी जवळून ओळखत होतो आणि मी हा आनंद साजरा करावा, असे त्याला वाटत असेल. दुस:या बाजूला क्लार्क माङयासोबत होता आणि तो म्हणाला, ‘हय़ुजला माझा अभिमान वाटत असेल,’ असे वॉर्नरने सांगितले.
क्लार्ककडून सर्वाना धक्का
पाठदुखीने त्रस्त क्लार्कचे पहिल्या कसोटीत खेळणो अनिश्चित वाटत होते; परंतु त्याने अर्धशतक झळकावून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. चहापानापूर्वी क्लार्कच्या दुखापतीने डोक वर काढले आणि रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. क्लार्कने 84 चेंडूंत 9 चौकार लगावून 6क् धावा केल्या. त्याने मैदान सोडले त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 2क्6 धावा झाल्या होत्या. क्लार्कने वॉर्नरसह तिस:या विकेटसाठी 118 धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : रॉजर्स झे. धवन गो. शर्मा 9, वॉर्नर झे. शर्मा गो. कर्ण 145, वॉटसन झे. धवन गो. अॅरोन 14, क्लार्क रिटायर्ड हर्ट 6क्, स्मिथ नाबाद 72, मार्श झे. कोहली गो. अॅरोन 41, लिऑन त्रि. गो. शमी 3, हॅडीन झे. साहा गो. शमी क्. अवांतर - 1क्; एकूण - 89.2 षटकांत 6 बाद 354 धावा. गोलंदाजी- शमी 17.2-1-83-2, अॅरोन 17-1-95-2, शर्मा 2क्-4-56-1, कर्ण 23-1-89-1, विजय 12-3-27-क्.