शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

वेंगसरकर यांना ‘जीवनगौरव’

By admin | Updated: November 19, 2014 04:07 IST

जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले

मुंबई : भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) यंदाचा कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, भुवनेश्वर कुमारला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबरला या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक वेंगसरकर यांनी १९७६ ते १९९१ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व केले. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव आणि सदस्य संजय पटेल यांच्या समितीने वेंगसरकर यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली. त्यांना या पुरस्कारांतर्गत एक सन्मानचिन्ह, चषक आणि २५ लाखांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. वेंगसरकर यांनी १९७५-७६ या हंगामात इराणी चषक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना शेष भारताविरुद्ध खणखणीत शतक ठोकले होते. तसेच, १९८३चा विश्वचषक आणि १९८५च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता. १९८७ ते ८९ या कालावधीत भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व वेंगसरकर यांच्याकडे होते. याव्यतिरिक्त वेंगसरकर २००६ ते ०८ या कालावधीत वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षही होते. लॉर्ड्सवर तीन कसोटी शतक करणारे वेंगसरकर हे एकमेव खेळाडू आहेत. त्यांच्या १२६ धावांच्या फटकेबाजीमुळेच भारताने १९८६ मध्ये लॉडर््सवर कसोटी विजय साजरा केला होता. याआधी सचिन तेंडुलकरला (२००६-०७ व २००९-१९) व वीरेंद्र सेहवाग (२००७-०८), गौतम गंभीर (२००८-०९), राहुल द्रविड (२०१०-११), विराट कोहली (२०११-१२) आणि रविचंद्रन अश्विन (२०१२-१३) यांना पॉली उम्रीगर चषकाने सन्मानित करण्यात आले होते. जम्मू-काश्मीर संघाचा कर्णधार परवेज रसूल याला २०१३-१४च्या रणजी हंगामात सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले असून, त्याला लाला अमरनाथ चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याने ९ सामन्यांत ६६३ धावा आणि २७ विकेट घेतल्या. या पुरस्कारासह त्याला अडीच लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कर्नाटक संघाचा कर्णधार विनय कुमार यालाही सर्वोत्तम अष्टपैलू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विनयने १२ सामन्यांत ११३ धावा व ४० विकेट घेतल्या आहेत. महाराष्ट्राचा मधल्या फळीचा फलंदाज केदार जाधव याने २०१३-१४ च्या रणजी सत्रात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याला माधव राव सिंधिया पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशचा गोलंदाज ऋषी धवन यालाही सर्वोत्तम गोलंदाज म्हणून माधव राव सिंधिया चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)