वरूण, अभिनय, अभिजीतची आगेकुच

By Admin | Updated: June 8, 2015 00:30 IST2015-06-08T00:30:21+5:302015-06-08T00:30:21+5:30

सिक्स् रेड स्नूकर स्पर्धेत वरूण मदन, लक्ष्मण रावत, करण मंगत, अभिनय एडके, अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

Varun, Abhinay, Abhijeet's forthcoming | वरूण, अभिनय, अभिजीतची आगेकुच

वरूण, अभिनय, अभिजीतची आगेकुच

पुणे : सिक्स् रेड स्नूकर अजिंंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सिक्स् रेड स्नूकर स्पर्धेत वरूण मदन, लक्ष्मण रावत, करण मंगत, अभिनय एडके, अभिजीत रानडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंंदू जिमखानातर्फे व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत दिल्लीच्या अव्वल मानांकित वरूण मदन याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करीत बोरीवलीच्या मुकुंद भराडियाचा ४-0 (३७-१७, ४१-२१, ३३-३०, ४९ (४०) -0१ ) असा सहज पराभव केला. पीवायसीच्या अभिजीत रानडे याने मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या माजी राष्ट्रीय महिला खेळाडू अरांता सँचेस्चा ४-१ (४५-०९, ४८-३९, ४४-१५, १७-३७, ४२-२५) असा पराभव करुन आगेकुच केली.
डोंबिवलीच्या अभिनय एडकेने पुना क्लबच्या कुमार शिंदेला ४-१ (४४-२०, ३७-३१, ०८-५१, ४४-३५, ४९-२०) असे पराभुत केले. रेल्वेच्या लक्ष्मण रावत याने एपीज्च्या जवाहर मानकरवर ४-0 (४८ (४८)-00, ६४ (५८)-0४, ३५-०९, ६२-२७) असा एकतर्फी विजय मिळवला. लक्ष्मण याने आपल्या विजयात पहिल्या व दुसऱ्या फ्रेममध्ये ४८ व ५८ गुणांचा ब्रेकही नोंदविला. उत्तरप्रदेशच्या अक्षय कुमारने औरंगाबादच्या अभिजीत राजपुतचे आव्हान ४-० (६०-००, ३२-२८, ४८-०९, ५३-११) असे माडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: तिसरी फेरी : शहाबाज खान-पीएसपीबी वि.वि.मनोज गाडगीळ -डेक्कन ४-१ (२०-४०, ४१-०५, ४२-०२, ४९-१६, ४१-०१); वरूण मदन (दिल्ली) वि.वि. मुकुंद भराडिया (बोरीवली) ४-० (३७-१७, ४१-२१, ३३-३०, ४९ (४०)-०१); करण मंगत-वाशी वि.वि.निमिश कुलकर्णी-पीवायसी ४-१ (५०-०४, ३१-३०, २९-१५, ००-६० (५४), ५३-१५); अभिनय एडके (डोंबिवली) वि.वि.कुमार शिंंदे (पुना क्लब) ४-१ (४४-२०, ३७-३१, ०८-५१, ४४-३५, ४९-२०); अभिजीत रानडे-पीवायसी वि.वि.अरांता सँचेस-टर्फ क्लब ४-१ (४५-०९, ४८-३९, ४४-१५, १७-३७, ४२-२५); लक्ष्मण रावत -रेल्वे वि.वि.जवाहर मानकर-एपीज् ४-० (४८ (४८)-००, ६४ (५८)-०४, ३५-०९, ६२-२७); अक्षय कुमार (उत्तरप्रदेश) वि.वि.अभिजीत राजपुत-औरंगाबाद ४-० (६०-००, ३२-२८, ४८-०९, ५३-११);

Web Title: Varun, Abhinay, Abhijeet's forthcoming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.