VIDEO- विजयानंतर मैदानात 'वंदे मातरम'च्या घोषणा, हॉटेलमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: September 26, 2016 18:22 IST2016-09-26T18:17:52+5:302016-09-26T18:22:16+5:30
टीम इंडियाने एतिहासीक 500 व्या कसोटीत न्यूझीलंडवर 197 धावांनी विजय मिळवला आणि कानपूरचं ग्रीन पार्क मैदान 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी

VIDEO- विजयानंतर मैदानात 'वंदे मातरम'च्या घोषणा, हॉटेलमध्ये टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि.26- टीम इंडियाने एतिहासीक 500 व्या कसोटीत न्युझीलंडवर 197 धावांनी विजय मिळवला आणि कानपूरचं ग्रीन पार्क मैदान 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी दुमदुमलं.
विजयानंतर भारतीय संघ जेव्हा हॉटेलमध्ये पोहोचला खेळाडूंवर पुष्पवर्षाव करण्यात आला आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. भारताच्या खेळाडूंनीही हॉटेलमध्ये खूप मस्ती केली. ग्रीन पार्क मैदानात उपहारानंतर न्यूझीलंडचा शेवटचा गडी बाद झाला आणि प्रेक्षकांनी 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा दिल्या. एतिहासीक कसोटी सामन्यातील विजयानंतर प्रेक्षक आनंदात नाचत होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर हॉटेलच्या कर्मचा-यांनी भारतीय खेळाडूंवर पुष्पवर्षाव केला . त्यानंतर खेळाडूंनी हॉटेलच्या लॉबीमध्ये केक कापून आनंद साजरा केला.
Traditional Dhol, Hotel staff and even the Chefs welcomed #TeamIndia after their win in the #500thTest#INDvNZpic.twitter.com/z0UupGtbko
— BCCI (@BCCI) September 26, 2016