युवी तळपला, बंगळुरू ४ बाद १८७

By Admin | Updated: May 13, 2014 23:52 IST2014-05-13T23:52:20+5:302014-05-13T23:52:20+5:30

आयपीएल : प्रत्युत्तरात दिल्ली ५ बाद १०३

UV Talapala, Bengaluru 187 for 4 | युवी तळपला, बंगळुरू ४ बाद १८७

युवी तळपला, बंगळुरू ४ बाद १८७

पीएल : प्रत्युत्तरात दिल्ली ५ बाद १०३
बंगळुरू : सिक्सर किंग युवराज सिंह (६८) यांच्या वादळी अर्धशतकी खेळाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीसमोर विजयासाठी १८७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले़ अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत दिल्ली १३़१ षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या होत्या़
एका बाजूने नियमित अंतराने गडी बाद होत असताना युवराज सिंह दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना ९ गगनचंुबी षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने अवघ्या २९ चेंडूंत नाबाद ६८ धावा कुटल्या़ या व्यतिरिक्त एबी डिव्हिलियर्स याने ३३, पार्थिव पटेल याने २९ धावांचे योगदान दिले़ युवराजच्या वादळी खेळाच्या बळावर बंगळुरूने अखेरच्या चार षटकांत ७१ धावा लुटल्या़
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना एक तास उशिरा सुरू झाला़ दिल्लीचा कर्णधार केविन पीटरसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला़ विशेष मध्ये सलग फ्लॉप ठरूनही आज बंगळुरू संघात गेलला स्थान देण्यात आले़ त्याने मोहंमद शमीच्या गोलंदाजीवर षटकार खेचला त्यानंतर जेपी़ ड्युमिनीच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार लगावताना आपले इरादे स्पष्ट केले़ मात्र तो जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही़
राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला़ त्याने २३ चेंडूत २२ धावांची खेळी केली़ अद्यापही त्याला आयपीएल सातमधील पहिल्या अर्धशतकाची प्रतीक्षा आहे़ बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करू शकला नाही़ तो १० धावबाद झाला़ त्यानंतर पार्थिव पटेल शमीच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन तंबूत परतला़ सचिन राणा याने नाबाद १५ धावा केल्या़ दिल्लीकडून मोहंमद शमी, सिद्धार्थ कौल, राहुल शुक्ला यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला़
संक्षिप्त धावफलक :
बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १८६़ (ख्रिस गेल २२, पार्थिव पटेल २९, विराट कोहली १०, एबी डिव्हिलियर्स ३३, युवराज सिंह नाबाद ६८, सचिन राणा नाबाद १५़ मोहंमद शमी १/३१, कौल १/३७, शुक्ला १/४१)़
दिल्ली : १३़१ षटकांत ५ बाद १०३़ (क्विंटन डी कॉक ६, मुरली विजय १, मयंक अग्रवाल ३१,केविन पीटरसन ३३, ड्यूमिनी नाबाद २४, केदार जाधव नाबाद ०़ मुथय्या मुरलीधन २/२५, मिशेल स्टार्क १/११)़

Web Title: UV Talapala, Bengaluru 187 for 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.