युवीचा अभिनेत्री हेजल किचसोबत साखरपुडा ?

By Admin | Updated: November 12, 2015 13:12 IST2015-11-12T13:12:09+5:302015-11-12T13:12:22+5:30

युवराज सिंग व अभिनेत्री हेजल किच यांचा इंडोनेशियातील बाली येथे साखरपुडा पार पडल्याचे वृत्त असून या सोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील मोजकीच मंडळी उपस्थित होती असे सूत्रांनी सांगितले.

UV actress Hajal kich sachharpuda? | युवीचा अभिनेत्री हेजल किचसोबत साखरपुडा ?

युवीचा अभिनेत्री हेजल किचसोबत साखरपुडा ?

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - हरभजन सिंगपाठोपाठ भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. युवराज सिंग व अभिनेत्री हेजल किच यांचा इंडोनेशियातील बाली येथे साखरपुडा पार पडल्याचे वृत्त असून या सोहळ्याला दोघांच्या कुटुंबातील मोजकीच मंडळी उपस्थित होती असे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून युवराज सिंग व बॉडीगार्ड फेम अभिनेत्री हेजल किच यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा चांगलीच रंगली होती. हरभजन सिंगच्या विवाहसोहळ्यालाही हे दोघे जोडीने उपस्थित असल्याने हरभजनपाठोपाठ युवराजच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. प्रसारमाध्यमांमधील वृत्तानुसार युवराज सिंग व हेजल किच यांचा साखरपुडा बालीतील बेटावर पार पडल्याचे समजते. या सोहळ्याला दोघांचे कुटुंबीय व युवराजचे निवडक मित्रच उपस्थित होते. अद्याप या वृत्तावर युवराज सिंग किंवा हेजल किच यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युवराज व हेजलचा विवाह पुढील वर्षी होईल असे सूत्रांनी सांगितले. 

Web Title: UV actress Hajal kich sachharpuda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.