प्रिव्‘ू जोड

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:12+5:302015-02-16T21:12:12+5:30

स्कॉटलंड संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. आयर्लंडविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज एलस्डेयर इव्हांस आणि ऑफ स्पिनर माजिद हक यांनी एकूण ७ बळी घेतले होते. याव्यतिरिक्त फॉर्मात असलेला माजी कर्णधार कायले कोएत्जर व सलामीवीर कॅलम मॅकलॉयड यांच्याकडून स्कॉटलंड संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे.

User Connect | प्रिव्‘ू जोड

प्रिव्‘ू जोड

कॉटलंड संघ विश्वकप स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. आयर्लंडविरुद्ध सराव सामन्यात वेगवान गोलंदाज एलस्डेयर इव्हांस आणि ऑफ स्पिनर माजिद हक यांनी एकूण ७ बळी घेतले होते. याव्यतिरिक्त फॉर्मात असलेला माजी कर्णधार कायले कोएत्जर व सलामीवीर कॅलम मॅकलॉयड यांच्याकडून स्कॉटलंड संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे.
न्यूझीलंडतर्फे सलामी लढतीत रॉस टेलरचा अपवाद वगळता आघाडीच्या सर्वंच फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. टेलरने त्या लढतीत ४९ चेंडूंना सामोरे जाताना केवळ १४ धावा केल्या होत्या. स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत न्यूझीलंडला टेलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त ग्रँट इलियट आपली निवड सार्थ ठरविण्यास उत्सुक आहे.
स्कॉटलंड संघ तिसऱ्यांदा विश्वकप स्पर्धेत सहभागी होत आहे. यापूर्वी १९९९ व २००७ मध्ये स्कॉटलंड संघाने आठ सामने खेळले पण त्यांना एकाही लढतीत विजय मिळविता आला नाही. न्यूझीलंड संघाची देशाच्या दक्षिण भागात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये कामगिरी उल्लेखनीय ठरते. २०११ मध्ये क्राईस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत न्यूझीलंडला पाकिस्ताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: User Connect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.