प्रिव्ू जोड
By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:59+5:302015-01-29T23:16:59+5:30
गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची भारतीय संघाला ागरज आहे. जर इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने ही उणीव भरून काढली तर ते भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत भारताच्या तुलनेत सरस भासत आहे. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध बोनस गुणासह विजय साकारणाऱ्या इंग्लंडला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांत तीन गुणांची कमाई करणाऱ्या इंग्लंड संघाचे पारडे वरचढ मानल्या जाते, पण वाकाच्या खेळपीवर खेळणे कुठल्याही संघासाठी कसोटी असते. जेम्स ॲन्डरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण फलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर इयान बेलने तीन सामन्यांत एक शतक व एक अर्धशतकी खेळी करीत २२९ धावा फटकाविल्या आहेत. अष्टपैलू मोईन अलीने सलामीवीराची भूमिका बजाविताना फि

प्रिव्ू जोड
ग लंदाजी करणाऱ्या अष्टपैलूची भारतीय संघाला ागरज आहे. जर इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट बिन्नीने ही उणीव भरून काढली तर ते भारतीय संघासाठी उपयुक्त ठरेल. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत भारताच्या तुलनेत सरस भासत आहे. ब्रिस्बेनमध्ये भारताविरुद्ध बोनस गुणासह विजय साकारणाऱ्या इंग्लंडला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांत तीन गुणांची कमाई करणाऱ्या इंग्लंड संघाचे पारडे वरचढ मानल्या जाते, पण वाकाच्या खेळपट्टीवर खेळणे कुठल्याही संघासाठी कसोटी असते. जेम्स ॲन्डरसनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली, पण फलंदाजी मात्र त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. सलामीवीर इयान बेलने तीन सामन्यांत एक शतक व एक अर्धशतकी खेळी करीत २२९ धावा फटकाविल्या आहेत. अष्टपैलू मोईन अलीने सलामीवीराची भूमिका बजाविताना फिरकीपटूची जबाबदारीही सांभाळली आहे. या स्पर्धेतील कामगिरीचा विचार करता इंग्लंडचे पारडे वरचढ भासत आहे, पण भारताकडे विश्वकप स्पर्धेपूर्वी विजयी मार्गावर परतण्याची ही चांगली संधी आहे. (वृत्तसंस्था)प्रतिस्पर्धी संघभारत :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा.इंग्लंड : - ईयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स ॲन्डरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीवन फिन, ॲलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रुट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.सामन्याची वेळ : सकाळी ८.५० पासून.