उसेन बोल्टने जिंकली २०० मीटर दौड
By Admin | Updated: July 23, 2016 19:11 IST2016-07-23T19:11:07+5:302016-07-23T19:11:07+5:30
जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने पुढील महिन्यात आयोजित रिओ ऑलिम्पिकसाठी दावेदारी सादर करीत पुरुषांची २०० मीटर दौड जिंकली

उसेन बोल्टने जिंकली २०० मीटर दौड
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 23 - जमैकाचा वेगवान धावपटू उसेन बोल्ट याने पुढील महिन्यात आयोजित रिओ ऑलिम्पिकसाठी दावेदारी सादर करीत पुरुषांची २०० मीटर दौड जिंकली. केंड्रा हॅरिसन हिने १०० मीटर दौडीत २८ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. लंडन ऑलिम्पिकदरम्यान बोल्टने चार वर्षांआधी ज्या स्टेडियममध्ये १००, २०० आणि चार बाय १०० मीटरचे सुवर्ण पदक जिंकले होते त्याच स्टेडियममध्ये अॅनिव्हर्सरी क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ४० हजार प्रेक्षकांच्या साक्षीने २०० मीटर दौडीत सुवर्ण पटकविले.
या महिन्याच्या सुरुवातीला मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे किंग्स्टन येथे ऑलिम्पिक पात्रता चाचणीतून माघार घेणा-या बोल्टने या मोसमातील पहिली २०० मीटर दौड १९.८९ सेकंदात जिंकली. पनामाचा अलोंसो एडवर्ड दुस-या आणि ब्रिटनचा अॅडम गेमिली तिस-या स्थानावर राहिला. दुसरीकडे अमेरिकेच्या ऑॅलिम्पिक संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेली केंड्रा महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीची विजेती ठरली. तिने दौड जिंकण्यासोबतच स्वत:चा विश्वविक्रम देखील सुधारला. बल्गेरियाची योरडांका डोनकोव्हा हिने १९८८ साली १२.२१ सेकंद वेळ नोंदविली होती. हॅरिसनने त्यात ०.०१ सेकंदांची सुधारणा करीत नवा विश्वविक्रम नोंदविला.