यूएस ओपनची आजपासून सुरुवात
By Admin | Updated: August 25, 2014 02:34 IST2014-08-25T02:34:01+5:302014-08-25T02:34:01+5:30
सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच व अमेरिकेची सेरेना विलियम्स यांना वर्षाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम टेनिस यूएस ओपन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला विभागांत अव्वल मानांकन देण्यात आलेले आहे

यूएस ओपनची आजपासून सुरुवात
न्यूयॉर्क : सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच व अमेरिकेची सेरेना विलियम्स यांना वर्षाच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम टेनिस यूएस ओपन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला विभागांत अव्वल मानांकन देण्यात आलेले आहे. या वेळी उभय गटांत कोण चॅम्पियन ठरणार, याबाबत मात्र अंदाज वर्तविणे कठीण आहे.
गतविजेत्या स्पेनच्या राफेल नदालने मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे जोकोव्हिच व १७ ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा मानकरी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हे दिग्गज टेनिसपटू पुरुष विभागात विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
महिला विभागात सेरेना विलियम्सने सिनसिनाटी स्पर्धेत जेतेपद पटकावित सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. (वृत्तसंस्था)