कोस्टा रिका विरुद्ध उरुग्वे, सामना कोस्टा रिकाच्या खिशात ३-१ सामना जिंकला
By Admin | Updated: June 15, 2014 06:10 IST2014-06-15T05:09:32+5:302014-06-15T06:10:45+5:30
ग्रुप ऑफ डेथ म्हणजेच ग्रुप डी म्ध्ये उरुग्वे विरुद्ध कोस्टा रिकाच्या सामन्यात कोस्टा रिकाच्या जॉन कॅम्बेलने ५३ व्या मिनिटाला पहिला गोल करत खाते उघडले

कोस्टा रिका विरुद्ध उरुग्वे, सामना कोस्टा रिकाच्या खिशात ३-१ सामना जिंकला
फोर्टालेझा दि. १५ - कोस्टा रिकाने ३-१ या फरकाने सामना जिंकला. ग्रुप ऑफ डेथ म्हणजेच ग्रुप डी म्ध्ये उरुग्वे विरुद्ध कोस्टा रिकाच्या सामन्यात कोस्टा रिकाच्या जॉन कॅम्बेलने ५३ व्या मिनिटाला पहिला गोल करत खाते उघडले. त्यांनतर जोरदार प्रयत्न करूनही उरुग्वेच्या खेळाडूंना गोलपोस्ट पर्यंत पोहोचता आले नाही. दुसरा गोल ऑस्कर ड्यूराटेने केल्यानंतर प्रेक्षकांत जल्लोषाचे वातावरण होते. तर खेळाच्या शेवटच्याभागात उरैनाने गोल केल्याने कोस्टा रिका सामना आपल्या खिशात घालणार असल्याची प्रेक्षकांची खात्री खरी ठरली.