उरी हल्ल्याने प्रचंड दु:ख झाले - विराट कोहली
By Admin | Updated: September 26, 2016 17:21 IST2016-09-26T16:53:40+5:302016-09-26T17:21:16+5:30
उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विराट कोहलीने श्रध्दांजली वाहिली. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचं

उरी हल्ल्याने प्रचंड दु:ख झाले - विराट कोहली
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २६ - ऐतिहासिक ५०० व्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडवर १९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे कर्णधार विराट कोहली आनंदात होता. पण या आनंदाच्या क्षणातही तो उरी दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना विसरला नाही.
उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्याने श्रध्दांजली वाहिली. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे विराटने याप्रसंगी सांगितले. उरी हल्ल्यात आपण आपल्या जवानांचे अमूल्य जीव गमावले त्याचे प्रचंड दु:ख आहे.
शहीद जवानांच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल त्याची मी कल्पनाही करु शकत नाही. एक भारतीय या नात्याने उरी हल्ल्याचे प्रचंड दु:ख झाले असे विराटने सांगितले.