सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीसीएला झटका
By Admin | Updated: July 20, 2016 04:54 IST2016-07-20T04:54:20+5:302016-07-20T04:54:20+5:30
लोढा समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याचा मोठा झटका उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला (यूपीसीए) बसणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीसीएला झटका
कानपूर : लोढा समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याचा मोठा झटका उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला (यूपीसीए) बसणार आहे. संघटनेचे सर्वच निर्देशक ७०हून अधिक वर्षांचे असून, संघटनेचे कोशाध्यक्ष यांनाही पदावरून पायउतार व्हावे लागेल.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोएब अहमद (७८ वर्षे), पी. डी. पाठक (८३), मदन मोहन मिश्रा (८३), एस. के. अग्रवाल (७९) आणि ज्योती वाजपेयी (८०) असे पाचही निर्देशक आणि कोशाध्यक्ष के. एन. टंडन (८१) हे लोढा समितीच्या शिफारशींनुसार संघटनेवर कार्य करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे, दुहेरी हितसंबंधांच्या नियमाप्रमाणे सीएओ दीपक शर्मा आणि वरिष्ठ निवड समितीचे सदस्य ज्ञानेंद्र पांडट्ये यांनादेखील आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे.
शर्मा यांची दोन्ही मुले १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळत असून, पांड्ये यांचा पुतण्या संभाव्य रणजी संघात आहे. त्याच वेळी दुसरीकडे लोढा समितीच्या या शिफारशींमुळे यूपीसीएमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार असल्याने माजी रणजी खेळाडू आनंदी आहेत.
त्याचप्रमाणे, लोढा समितीच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ नियमाच्या कचाट्यात यूपीसीएचे सचिव आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्लादेखील अडकले आहेत. दरम्यान, यूपीसीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्ला यांचे पद धोक्यात नाही, कारण आयपीएल अध्यक्षपद थेट बीसीसीआयशी जोडलेले नाही. (वृत्तसंस्था)