अपूर्वीला रौप्य
By Admin | Updated: September 6, 2015 00:08 IST2015-09-06T00:08:30+5:302015-09-06T00:08:30+5:30
युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या १0 मीटर एअर

अपूर्वीला रौप्य
म्युनीच : युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या १0 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले.
जयपूरच्या २२ वर्षीय अपूर्वीने २0६.९ गुणांसह रौप्यपदक मिळविले. ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या इराणच्या अहमादी इलाहेल हिच्यापेक्षा फक्त 0.६ गुणाने मागे राहिली. अहमादी इलाहेलने २0७.५ गुण मिळविले. सर्बियाच्या आंद्रिया अर्सोविचने शूट आॅफमध्ये क्रोएशियाच्या वेलेनटिना गस्टिन हिला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.
फायनलमध्ये अपूर्वीने सुरुवातीलाच १0.८ गुण घेत आघाडी घेतली. मात्र, नंतर ती एकूण ३0.६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरली. त्यानंतर अपूर्वी पदकांच्या शर्यतीत कायम राहिली. अपूर्वीने अखेरच्या फेरीत १0.२ गुण मिळवले आणि अखेर ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या अहमादीपासून फक्त 0.२ गुणाने पिछाडीवर होती. तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने १0.४ गुण मिळविले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अपूर्वीने एप्रिलमध्ये कोरियात चांगवोन येथे कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे ती पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरली होती. लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता गगन नारंग आणि गुरप्रीतसिंह आपापल्या गटाच्या फायनलमध्ये पोहोचले; परंतु पदक जिंकण्यात त्यांना अपयश आले. (वृत्तसंस्था)