दुसरे सुवर्ण जिंकले : स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नेमबाजाचा बहुमाननवी दिल्ली : विश्वविक्रम मोडून इतिहास घडविणारी देशातील अव्वल नेमबाज अपूर्वी चंदीलाने स्विडीश कप ग्रा. प्रि. मध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकून शुटर आॅफ टुर्नामेंटचा बहुमान पटकावला. स्वीडनच्या साव्जो येथे झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये अपूर्वीने १0 मीटर ट्रायसेरीज स्पर्धेत २0८.९ गुण पटकावीत सुवर्णपदक जिंकले. रौप्य आणि कांस्य पदके स्विडीश नेमबाजांनी पटकावली.अपूर्वीने मंगळवारी १0 मीटर एअर रायफल स्पर्धेत २११.२ गुणांसह नवा विश्वविक्रम स्थापित केला होता. तिने गेल्यावर्षी कोरियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून आॅलिम्पिक कोटा मिळविला होता. स्पर्धेतील तिची चौफेर कामगिरी पाहून तिला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नेमबाजाचा बहुमान मिळविला.
अपूर्वीची अभूतपूर्व कामगिरी
By admin | Updated: January 8, 2016 03:32 IST