उन्मुक्त चंद, अंबाती रायडू कर्णधार
By Admin | Updated: August 2, 2015 01:26 IST2015-08-02T01:26:48+5:302015-08-02T01:26:48+5:30
आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या अ संघांची तिरंगी मालिका आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धचे दोन अनधिकृत कसोटी सामन्यासाठी भारतीय अ संघाची आज निवड करण्यात आली.
उन्मुक्त चंद, अंबाती रायडू कर्णधार
चेन्नई : आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या अ संघांची तिरंगी मालिका आणि दक्षिण आफ्रिके विरुद्धचे दोन अनधिकृत कसोटी सामन्यासाठी भारतीय अ संघाची आज निवड करण्यात आली. यामध्ये तिरंगी मालिकेसाठी उन्मुक्त चंद, तर अनधिकृत कसोटीसाठी अंबाती रायडू यांची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय निवड समितीच्या चेन्नई येथे झालेल्या बैठकीत ही संघ निवड करण्यात आली. चेन्नई येथे ५ ते १४ आॅगस्ट दरम्यान तिरंगी मालिका खेळविण्यात येणार आहे. यात यजमान भारतासह आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे अ संघ सहभागी होत आहेत. या मालिकेसाठी उन्मुक्त चंद हा भारताचा कर्णधार असेल. त्यानंतर केरळमध्ये १८ ते १८ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या चार दिवसीय दोन कसोटी सामन्यासाठी अंबाती रायडू याच्याकडे भारताचे नेतृत्व असेल. भारतीय अ संघाने काल आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन सामन्यांची मालिका गमावली होती. पहिला सामना अनिर्णीत राहिला, तर दुसरा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता.
आज निवड करण्यात आलेले संघ असे
तिरंगी मालिका : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनिष पांडे, करुण नायर (यष्टीरक्षक), केदार जाधव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, संदीप शर्मा, ऋष कलारिया, मनदीप सिंग, गुरुकिरत सिंग, रिषी धवन.
अनधिकृत कसोटी : अंबाती रायडू (कर्णधार), करुण नायर (यष्टीरक्षक), अभिमन्यू मुकुंद, अंकुश बेन्स, श्रेयस अय्यर, बाबा अपराजित, विजय शंकर, जयंत यादव, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, अभिमन्यू मिथून, शार्दुल ठाकूर, ईश्वर पांडे, शेल्डन जॅक्सन, जीवनजोत सिंग.
उन्मुक्त चंद
१९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, २०१२ मध्ये त्याने या गटाचा विश्वचषक जिंकून दिला होता. यावेळी त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १११ धावांची खेळी केली होती.
अंबाती रायडू
राष्ट्रीय क्रिकेट अॅकडमीत २००१ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या रायडूने इंग्लंडविरुद्ध २००२मध्ये नाबाद १७७ धावांची खेळी केली होती. त्याने १९ वर्षांखालीलसुद्धा प्रतिनिधित्व केले आहे.