शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

बाप-लेकाचा दुर्दैवी अंत! पहिल्यांदाच शर्यतीसाठी एकत्र उतरले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 13:04 IST

अशा खेळांमध्ये थरार असतो तितकाच जीवाचाही असतो धोका

Roger Stockton: Formula 1 पासून Moto GP पर्यंत कार रेसिंग असो किंवा बाईक रेसिंग असो, सर्व शर्यती चाहत्यांना भुरळ घालतात. या खेळांमध्ये जितका थरार असतो तितकेच ते ड्रायव्हरसाठी घातक असतात. अनेक वेळा अशा शर्यतीत मोठे जीवघेणे अपघात होतात. त्यात चालकाचा जीवही जातो. असाच एक दुर्दैवी प्रकार एका बाप-लेकासोबत घडला आणि कार रेसिंगमध्ये पिता-पुत्राला जीव गमवावा लागला. हा अपघात आयल ऑफ मॅन टीटी (Isle of Man TT) शर्यतीदरम्यान घडला. या इव्हेंटमध्ये, ५६ वर्षीय रॉजर स्टॉकटन आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा ब्रॅडली यांचा शुक्रवारी साइडकार रेसिंग (Sidecar Race) च्या दुसऱ्या लॅपदरम्यान (दुसऱ्या फेरीच्या शर्यतीत) मृत्यू झाला.

प्रथमच रेसिंगमध्ये सामील झाला होता ब्रॅडली

साइड कार रेसिंगमध्ये 3-चाकी बाईक-कार वापरली जाते. त्याचा वेग २६० किमी प्रतितास इतका असू शकतो. रॉजर हा एक अनुभवी रेसर होता तर त्याचा मुलगा ब्रॅडली प्रथमच या शर्यतीत भाग घेत होता. रॉजर आणि ब्रॅडली हे इंग्लंडचे रहिवासी होते. 'आयल ऑफ मॅन टीटी'ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्यंत दुःखाने सांगावे लागते की वडील-मुलगा रॉजर आणि ब्रॅडली यांचा अपघाती मृत्यू झाला. रॉजर हा अनुभवी टीटी रेसर होता. ही त्याची २०वी शर्यत होती. रॉजरने २००० ते २००८ पर्यंत सतत या स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यानंतर रॉजरने २०१०, २०१७ या वर्षी या स्पर्धेत भाग घेतला होता.

यावर्षी या स्पर्धेत एकूण ५ जणांचा झालाय मृत्यू

'ऑटोस्पोर्ट डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी या स्पर्धेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. साइड कार ड्रायव्हर सीझर चॅनेलचा गेल्या शनिवारी ३७.७३ च्या रेस कोर्सवर मृत्यू झाला. रॉजर आणि ब्रॅडली होते त्याच ठिकाणी त्याचाही मृत्यू झाला. या शिवाय मार्क पर्स्लो आणि डेव्ही मॉर्गन नावाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला होता. आम्ही तुम्हाला सांगतो की ही 'आयल ऑफ मॅन टीटी' शर्यत बेटावरील सार्वजनिक रस्त्यावर होते.

टॅग्स :AccidentअपघातcarकारSocial Mediaसोशल मीडियाEnglandइंग्लंड