शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

टीम इंडियासोबत दीड वर्षांची सोबत अविस्मरणीय : शास्त्री

By admin | Published: May 27, 2016 4:01 AM

भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्याने दीड वर्ष काम करणे आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचे मत रवी शास्त्री यांनी नोंदविले आहे. कराराचे नूतनीकरण करणार का, यावर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्याने दीड वर्ष काम करणे आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचे मत रवी शास्त्री यांनी नोंदविले आहे. कराराचे नूतनीकरण करणार का, यावर मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. भारतीय संघासोबतच्या त्यांच्या कार्यकाळाबद्दल विचारताच शास्त्री म्हणाले, ‘मी आधी ज्या संघाचा खेळाडू राहिलो त्याच संघाचा संचालक म्हणून १८ महिने काम सांभाळणे संस्मरणीय ठरले. या दरम्यान जे काही निष्पन्न झाले ते आयुष्यात सर्वांत अविस्मरणीय म्हणावे लागेल. याचे श्रेय खेळाडूंना जाते.’बीसीसीआयने जाहिरात दिल्यास मुख्य कोच पदासाठी अर्ज करणार का, असा सवाल करताच शास्त्री यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी केवळ आयपीएल फायनलच्या अ‍ॅक्रिडेशनसाठी अर्ज करणार आहे.’आॅगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडला १-३ ने मालिका गमविल्यानंतर शास्त्री यांनी संचालकपद सांभाळले. ते यंदा टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर होते. जुन्या स्मृतींना उजाळा देत ते म्हणाले,‘१९८३ चा विश्वकप आणि १९८५ची विश्व क्रिकेट चॅम्पियनशिप स्मरणात आहेत. पण, संघासोबत घालविलेले १८ महिने त्याहून विशेष ठरले. इंग्लंडला वन-डेत त्यांच्याच भूमीत नमविले. टी-२० तही इंग्लंडचा व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेत २२ वर्षानंतर मालिका जिंकली. द. आफ्रिकेला एका दशकानंतर कसोटी मालिकेत पराभूत केले.’ या मालिकांमध्ये विशेष अशी कुठली मालिका होती, या प्रश्नाच्या उत्तरात शास्त्री यांनी ‘मी तुलना करणार नाही. निर्णय चाहत्यांना घ्यायचा आहे.’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)कोहलीला वन-डे संघाचे कर्णधारपद देखील सोपवायला हवे का, या पश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून शास्त्री म्हणाले, ‘मी काय सांगावे. कोहली केवळ २७ वर्षांचा आहे. त्याचे करिअर बराच काळ चालणार आहे.’ आपल्या कार्यकाळात अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांनी विशेष मेहनत घेत वेगवान सुधारणा केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.