अविस्मरणीय पुनरागमन : मोर्केल
By Admin | Updated: October 7, 2015 03:07 IST2015-10-07T03:07:48+5:302015-10-07T03:07:48+5:30
डेव्हिड व्हिसे जखमी झाल्यामुळे ऐनवेळी संघात स्थान मिळाल्याच्या संधीचे सोने करणारा वेगवान गोलंदाज एल्बी मोर्केल याने सोमवारी भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांत तीन

अविस्मरणीय पुनरागमन : मोर्केल
कटक : डेव्हिड व्हिसे जखमी झाल्यामुळे ऐनवेळी संघात स्थान मिळाल्याच्या संधीचे सोने करणारा वेगवान गोलंदाज एल्बी मोर्केल याने सोमवारी भारताविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात १२ धावांत तीन गडी बाद केले. तो सामनावीर देखील ठरला. द. आफ्रिका संघात असे पुनरागमन होणे नेहमी स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया एल्बीने व्यक्त केली.
तो म्हणाला,‘मी या संधीमुळे फारच आनंदी आहे. क्रिकेटमध्ये चढउताराचा सामना करावाच लागतो. कालची रात्र माझी होती. पुढे आणखी कुणाऱ्या वाट्याला असे यश येऊ शकेल. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यामुळे मी
भाग्यवान ठरलो.’ मोर्केलला धर्मशाळा येथील पहिल्या लढतीत संघात स्थान मिळू शकले नव्हते. पण फाफ डुप्लेसिसने त्याला मचँट डी लांगेऐवजी संघात स्थान दिले.
यावर मोर्केल म्हणाला,‘हा अविस्मरणीय क्षण होता. दौऱ्यावर येणार की नाही हे दोन आठवड्यांआधी मला माहिती नव्हते. डेव्हिड व्हिसे जखमी झाल्याने माझे संघात स्वागत झाले. गेल्या शुक्रवारी येथे आगमन झाले. मी फारच समाधानी आहे. गेल्या मोसमात टायटन्स संघात खूप मेहनत केल्यामुळे कदाचित संघात स्थान देण्यात आले असावे असा माझा समज आहे.’