स्मितचे अनपेक्षित विजेतेपद

By Admin | Updated: March 7, 2015 01:13 IST2015-03-07T01:13:29+5:302015-03-07T01:13:29+5:30

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मुलींच्या १५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावले.

Unexpected trick of smile | स्मितचे अनपेक्षित विजेतेपद

स्मितचे अनपेक्षित विजेतेपद

मुंबई : नाशिकच्या द्वितीय मानांकित स्मित तोष्णीवाल हिने अनपेक्षित निकाल लावताना
नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मुलींच्या १५ वर्षांवरील गटात विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात स्मितने झुंजार खेळाच्या जोरावर अग्रमानांकित मुंबईच्या सिमरन सिंघीला २-१ असा धक्का दिला.
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या (एमबीए) मान्यतेने मालाड येथील गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे पार पडलेल्या या स्पर्धेत
स्मितला पहिला सेट जिंकल्यानंतर अनुभवी सिमरनकडून कडवी लढत मिळाली. यानंतर निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये विजेतेपद हातून निसटणार नाही याची काळजी घेताना स्मितने सिमरनचे कडवे आव्हान २१-१५, १८-२१, २१-१५ असे परतावून लावले. मुलांच्या १५ वर्षांखालील गटात अग्रमानांकित नागपूरच्या रोहन
गुरबानी याने अपेक्षित विजेतेपद मिळवताना वलसाडच्या अनिरुद्ध
सिंग खुशवाहला २१-१३, २१-१५
असे नमवले.
दरम्यान, स्पर्धेच्या प्रत्येक वयोगटातील उपांत्यपूर्व फेरी गाठलेले खेळाडू नवी दिल्ली येथे २३ ते २५ मार्चदरम्यान रंगणाऱ्या अंतिम फेरीसाठी खेळतील. (क्रीडा प्रतिनिधी)

च्९ वर्षांखालील : (मुले) : पार्थ देवरे (नाशिक) वि.वि. वंश रोहित (भरुच) २१-१९, २०-२२, २१-१२. (मुली) : तारीनी सुरी (मुंबई) वि.वि. अनन्या नायडू (ठाणे) २१-४, २१-४.
च्११ वर्षांखालील : (मुले) : तेजस शिंदे (इस्लामपूर) वि.वि. प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) २१-१२, १५-२१, २१-८. (मुली) : तसनीम मीर (मेहसाना) वि.वि. तारा शाह (पुणे) २१-१५, २१-९.

मुंबईच्या तनिष्क सक्सेना याने मुलांच्या
१३ वर्षांखालील गटात वर्चस्व राखताना नाशिकच्या अमेय खोंडचा २१-१५, २१-९ असा धुव्वा उडवला; तर मुलींच्या याच वयोगटामध्ये साताराच्या अव्वल मानांकित आर्या देशपांडेने आपला हिसका दाखवताना मेहसानाच्या द्वितीय मानांकित तसनीम मीरला २१-१७, २१-१० असे नमवले.

Web Title: Unexpected trick of smile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.