शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: बॉक्सिंगमधील कामगिरीबद्दल असमाधानी; बीएफआय महासचिव जय कवळी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 07:33 IST

इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.

नागपूर : इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली होती, पण केवळ दोन पदके मिळाली. या कामगिरीवर मी मुळीच समाधानी नाही, असे मत बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केले.रविवारी येथे सुरू झालेल्या सब ज्युनियर मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेसाठी आलेले कवळी यांनी ४९ किलो गटात सुवर्ण जिंकणारा अमित पांगल याचे कौतुक केले. अमित अप्रतिम बॉक्सर असल्याचे सांगून कवळी म्हणाले, ‘आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनला नमविणारा अमित देशाचे भविष्य आहे. विकास कृष्णनदेखील सुवर्णाचा दावेदार होता; पण त्याला झालेल्या दुखापतीमुळे अखेर कांस्यवर समाधान मानावे लागले. भारताला आशियाडमध्ये केवळ दोनच पदकांची कमाई झाली.या कामगिरीवर समाधानी आहात का, असे विचाराताच ते म्हणाले, ‘मुळीच नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी नऊ पदके मिळाली होती. राष्टÑकुल आणि आशियाड यामध्ये कमालीचा फरक असला तरी किमान चार पदकांची अपेक्षा होती. कुठे चूक झाली याची समीक्षा आम्ही लवकरच करणार आहोत.’ महाराष्ट्रातूनही उत्तम बॉक्सर पुढे येत असल्याचे सांगून, मुंबईत बीएमसीच्या शाळांमधील बॉक्सिंग प्रयोग राज्यात सर्वत्र राबविण्याचा मानस असल्याचे कवळी म्हणाले. राज्यातील १८ जिल्ह्यांत बॉक्सिंगचे जाळे विणले असून, जवळपास ५५ रिंक उपलब्ध असल्याची माहिती कवळी यांनी दिली.मेरिकोम, सरितांचा पर्याय शोधण्याची मोहीमबीएफआयने आयोजित केलेल्या पहिल्या सब ज्युनियर मुलींच्या स्पर्धा आयोजनामागील हेतू सांगताना कवळी म्हणाले, ‘मेरिकोम किंवा सरिता यानंतरही आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला बॉक्सर्स हव्या असतील तर शोधमोहिम राबविणे गरजेचे आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भविष्यातील आॅलिम्पिक स्टार्सचे बीजारोपण होत असून, २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकसाठी युवा बॉक्सर मिळणार आहेत.’ सध्याच्या स्पर्धेतून प्रत्येक गटातील सात बॉक्सरची निवड केल्यानंतर त्यांना राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण दिले जाईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला बॉक्सिंगमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. अमित पांघलने मिळवलेले एकमेव सुवर्ण पदक हीच काय ती भारतासाठी जमेची बाब ठरली. तसेच, मोक्याच्यावेळी विकास कृष्ण जखमी झाल्याचाही फटकाही भारताला बसला. दुखापतीमुळे विकासला रिंगमध्ये उतरण्यास शक्य न झाल्याने त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा