‘यू मुंबा’ ने काढला वचपा....

By Admin | Updated: July 19, 2015 01:12 IST2015-07-19T01:12:58+5:302015-07-19T01:12:58+5:30

अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान यू मुंबा संघाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात विजयी सलामी देताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथरचा अवघ्या एका गुणाने

'U Mumba' removes Vachpa | ‘यू मुंबा’ ने काढला वचपा....

‘यू मुंबा’ ने काढला वचपा....

- महेश चेमटे,  मुंबई
अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान यू मुंबा संघाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्रात विजयी सलामी देताना गतविजेत्या जयपूर पिंक पँथरचा अवघ्या एका गुणाने २९-२८ असा पराभव केला. उपकर्णधार जीवा कुमार आणि अव्वल खेळाडू विशाल माने यांचा खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.
कर्णधार अनुप कुमारने पहिली चढाई करताना गतविजेत्यांचा अंदाज घेतला. रिशांक देवाडिगाने आक्रमक चढाई करताना मुंबईच्या गुणांचे खाते उघडले. पहिल्या ५ मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करून सामन्याची रंगत वाढवली. यानंतर मुंबईने आक्रमक पवित्रा घेतला. स्टार रायडर शब्बीर बापूने चकमदार चढाई करून मुंबईला ७-३ असे आघाडीवर नेले. यानंतर लगेच जयपूरच्या सोनीची पकड करून मुंबईकरांनी मजबूत पकड मिळवली. मध्यंतराला मुंबईने १६-१५ अशी नाममात्र आघाडी घेऊन सामन्यावर वर्चस्व मिळवले. यानंतर जयपूरने अनपेक्षित मुसंडी मारली. नवनीत गौतम, जसवीर यांनी आक्रमक चढाया, तर राजेश नरवालने दमदार पकडी करून मुंबईवर ३४व्या मिनिटाला लोण चढवून जयपूरला २४-२३ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनिटाला अनुपने निर्णायक गुण मिळवत मुंबईला २९-२८असा निसटता विजय मिळवून दिला.


‘बुल्स’ची विजयी मुसंडी
दुसऱ्या सामन्यात बंगळुरु बुल्स संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना बंगाल वॉरियर्सचे कडवे आव्हान ३३-२५ असे सहजपणे परतावून प्रो कबड्डीच्या दुसऱ्या सत्राची विजयी सुरुवात केली.

Web Title: 'U Mumba' removes Vachpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.