यू मुंबा ‘पँथर्स’ची शिकार करण्यास सज्ज!
By Admin | Updated: August 31, 2014 02:17 IST2014-08-31T02:17:00+5:302014-08-31T02:17:00+5:30
मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने पहिली चढाई केली आणि मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये कबड्डीच्या नव्या पर्वाचा o्रीगणोशा झाला.

यू मुंबा ‘पँथर्स’ची शिकार करण्यास सज्ज!
मुंबई : 26 जुलै 2क्14.. वेळ रात्री 8 वाजताची.. यजमान यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स आमने-सामने.. मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने पहिली चढाई केली आणि मुंबईतील एनएससीआय स्टेडियममध्ये कबड्डीच्या नव्या पर्वाचा o्रीगणोशा झाला. मुंबई आणि जयपूर यांच्या या लढतीने प्रो कबड्डीच्या नव्या अध्यायाची सुरुवात समारोपाकडे आली आहे.
प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वाचा ‘जेता’ कोण, याचे उत्तर रविवारी यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्या लढतीअखेर मिळेल. पहिल्या लढतीत मुंबाकडून भलेही पँथर्सला 45-31 असा पराभव पत्करावा लागला असला तरी त्यानंतरची पँथर्सची झेप ही वाखाणण्याजोगी होती आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. त्यामुळे या फायनल टशनमध्ये अटीतटीच्या लढतीची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
शुक्रवारच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पँथर्सनी पाटणा पायरट्सचा 38-18 असा धुव्वा उडवला, तर यू मुंबाला विजयासाठी बंगळुरू बुल्सने झुंजवले. मुंबाने ही लढत 27-23 अशी जिंकली.
पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पँथर्सने विजयी घोडदौड कायम राखत पहिल्या हाफमध्ये 2क्-7 अशी दमदार आघाडी घेत विजय पक्का केला होता. जसवीर सिंह आणि राजेश नरवाल यांच्या उत्कृष्ट चढाया आणि इतर खेळाडूंच्या पकडींनी पहिल्या हाफमध्ये पाटणावर 4 लोन चढवत पँथर्सला आघाडी मिळवून दिली. दुस:या हाफमध्ये पाटणाने संघर्ष केला. मध्यांतरानंतर पँथर्सला 17, तर पाटणाला 11 गुण मिळवण्यात यश आले. पँथर्सने दुस:या हाफमध्ये आणखी 2 लोन चढवले. पाटणाकडून रवी दलाल व दोवलेट बाशिमोव यांनी संघर्ष केला. (क्रीडा प्रतिनिधी)
यू मुंबाला बंगळुरू बुल्सने विजयासाठी झुंजवले. अनुप कुमार आणि रिशांक देवाडिगा या मुंबईच्या खेळाडूंना अजय ठाकूर आणि मंजित छिल्लर यांच्याकडून तोडीस तोड उत्तर मिळत होते. तरीही मुंबाने पहिल्या हाफमध्ये 15-9 अशी आघाडी घेतली.
दुस:या हाफमध्ये बुल्सने मुसंडी मारत सामन्यात चुरस निर्माण केली. अटीतटीच्या या लढतीने स्टेडियममध्ये शांतता पसरवली होती, परंतु मुंबाच्या मदतीला रिशांक देवाडीगा आणि विशाल माने धावून आले. या दोघांनी अनुक्रमे चढाई आणि पकडीत आपली छाप सोडून अटीतटीची ही लढत मुंबाच्या बाजूने 27-23 अशी झुकवली. या झुंजीनंतर मुंबाला अंतिम लढतीत चांगलाच घाम गाळावा लागणार आहे.