दोन वर्षानंतर वीरधवल करणार पुनरागमन
By Admin | Updated: November 12, 2014 00:38 IST2014-11-12T00:38:33+5:302014-11-12T00:38:33+5:30
राष्ट्रीय एक्वॉटिक चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होत असून जवळ जवळ दोन वर्षानंतर तो जलतरण स्पर्धेत पुनरागमन करीत आहे.

दोन वर्षानंतर वीरधवल करणार पुनरागमन
कोलकाता : एशियन गेम्स 2010चा कांस्यपदक विजेता वीरधवल खाडे उदय़ापासून येथे सुरु होणा:या पाच दिवसीय सिनिअर राष्ट्रीय एक्वॉटिक चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होत असून जवळ जवळ दोन वर्षानंतर तो जलतरण स्पर्धेत पुनरागमन करीत आहे. या स्पर्धेत विद्यमान चॅम्पियन कर्नाटकला महाराष्ट्र, रेल्वे आणि सेनादलाकडून कडवे आव्हान मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडे तहसिलदार पदावर नियुक्त असलेला वीरधवलने नुकत्याच झालेल्या इंचियोन स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. त्याच्या जागी दिल्लीच्या संदिप शेजवालची निवड करण्यात आली होती, ज्याने 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. शेजवाल सध्या सेनादलाकडून खेळत आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी जुलैमध्ये होणा:या फिना विश्वचॅम्पियनशीप-साठी पात्रता स्पर्धा म्हणून गणली जाणार आहे. (वृत्तसंस्था)