डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी
By Admin | Updated: June 8, 2016 22:04 IST2016-06-08T22:04:49+5:302016-06-08T22:04:49+5:30
आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे

डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ८ : आॅस्टे्रलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. पाच वेळा ग्रँडस्लॅम पटकावलेल्या रशियाच्या या स्टार खेळाडूला याआधी मार्च महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) अनिश्चित काळापर्यंत निलंबित केले होते.
शारपोव्हाने स्वत:हून काही महिन्यांपुर्वी लॉस एंजेलिसमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन जानेवारीमध्ये डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरल्याची माहिती दिली होती. त्यावेळी शारापोव्हाने, जागतिक डोपिंगविरोधी संस्थेने एक जानेवारीपासून खेळाडूंना मेलडोनियमचा वापर करण्यापासून विरोध केल्याचे माहित नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी या तारखेनंतर शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवने केले असल्याचे तीचे वकील जॉन हैगरटी यांनी सांगितले होते.
दरम्यान, बुधवारी देण्यात आलेल्या निकालामध्ये सांगण्यात आले की, शारापोव्हाचा उद्देश फसवणूक करण्याचा नव्हता. मात्र पॉझिटीव्ह रिपोर्टसाठी ती एकटी जबाबदार आहे. शिवाय यामध्ये तीची खूप मोठी चूकही आहे.
त्याचप्रमाणे आयटीएफने सांगितेल की, ‘‘आॅस्टे्रलिया ओपन दरम्यान पॉझिटीव्ह निकाल आल्यानंतर दोन फेब्रुवारीला मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेतही झालेल्या चाचणीत मारिया शारापोव्हाने मेलडोनियमचे सेवन केल्याचे निष्पण झाले होते.’’
दरम्यान, दोन वर्षांच्या लागलेल्या बंदीविरुध्द शारापोव्हा अपील करु शकते, परंतु तिच्याकडून अद्याप कोणताच निर्णय आलेला नाही. (वृत्तसंस्था)