दोन संघ ठरतील विश्वविजेते?

By Admin | Updated: November 12, 2014 00:46 IST2014-11-12T00:46:18+5:302014-11-12T00:46:18+5:30

आगामी विश्वचषक स्पध्रेतील चुरस आणखी वाढविण्यासाठी त्यात काही नव्या नियमांची ‘गुगली’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) मंगळवारी टाकली.

Two World Cup winners? | दोन संघ ठरतील विश्वविजेते?

दोन संघ ठरतील विश्वविजेते?

सुपर ओव्हर ‘आऊट’ : सामना बरोबरीत सुटल्यास होणार विभागणी
 
दुबई : आगामी विश्वचषक स्पध्रेतील चुरस आणखी वाढविण्यासाठी त्यात काही नव्या नियमांची ‘गुगली’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) मंगळवारी टाकली. स्पध्रेतील सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय आयसीसीने दुबईत झालेल्या बैठकीत घेतला. स्पध्रेची अंतिम लढत बरोबरीत सुटल्यास किंवा पावसामुळे सामना होऊ न शकल्यास जेतेपद दोन्ही संघांना विभागून देण्यात येण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे पार पडणा:या विश्वचषक स्पध्रेच्या 29 मार्च रोजी होणा:या अंतिम लढतीत दोन विश्वविजेते मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
2क्11च्या विश्वचषक स्पध्रेत सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरमध्ये खेळविण्याचा प्रयोग आयसीसीकडून करण्यात आला होता; परंतु आता सुपर ओव्हर न खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत सामना बरोबरीत सुटल्यास गटसाखळीत अव्वल स्थानावर असलेला संघ आगेकूच करेल. 1999च्या विश्वचषक स्पध्रेत ऑस्ट्रलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही लढत बरोबरीत सुटली होती आणि सुपर सिक्स गटात अव्वल असलेल्या ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित करण्यात आले होते. तसाच नियम आता 2क्15च्या विश्वचषकात पाहायला मिळेल. याव्यतिरिक्त विश्वचषकातील सर्व 49 सामन्यांसाठी डिसिजन रिव्हू सिस्टीम (डीआरएस) वापरण्याचा निर्णयही आयसीसीने घेतला आहे. (वृत्तसंस्था)
 
विश्वचषकविजेता संघ होणार मालामाल !
विश्वचषक स्पध्रेच्या बक्षीस रकमेत 2क् टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार विश्वचषकविजेत्या संघाला 24 कोटी 5क् लाख रुपये घरी घेऊन जाता येतील आणि तो संघ स्पध्रेत अपराजित राहिल्यास 24 कोटी 65 लाखांहून अधिक रक्कम मिळेल. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पध्रेत एकूण 61 कोटी 6क् लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 2क्11च्या विश्वचषक स्पध्रेच्या तुलनेत हा आकडा 2क् टक्के जास्त असल्याचे आयसीसीने सांगितले. 2क्11चा विश्वचषक भारत, बांगलादेश आणि o्रीलंका येथे खेळविण्यात आला होता आणि त्यात एकूण 49 कोटी 35 लाखांचे पारितोषिक देण्यात आले होते.
 2क्15 विश्वचषकात अपराजित राहणा:या संघाला 24 कोटी 76 लाख रुपये, तर केवळ एक पराभव पत्करणा:या संघाला 24 कोटी 5क् लाख देण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. उपविजेत्या संघाला 1क् कोटी 78 लाख, तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 3 कोटी 7क् लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतील 4 पराभूत संघांना प्रत्येकी 1 कोटी 84 लाख, तर साखळी सामन्यात प्रत्येक लढत जिंकणा:या संघाला 27 लाख 72 हजार रुपये मिळणार आहेत. पहिल्याच फेरीत बाद होणा:या 6 संघांना प्रत्येकी 21 लाख 56 हजार मिळणार आहेत. दुबईत दोन दिवस चाललेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 29 मार्च 2क्15 या कालावधीत होईल.

 

Web Title: Two World Cup winners?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.