विदर्भाच्या दोन खेळाडू भारतीय संघात

By Admin | Updated: July 5, 2016 20:58 IST2016-07-05T20:58:14+5:302016-07-05T20:58:14+5:30

कॅनडामधील सरे शहरात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी विदर्भातील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे

Two Vidarbha players in the Indian squad | विदर्भाच्या दोन खेळाडू भारतीय संघात

विदर्भाच्या दोन खेळाडू भारतीय संघात

नागपूर : कॅनडामधील सरे शहरात होणाऱ्या महिलांच्या विश्वचषक सॉफ्टबॉल
स्पर्धेसाठी विदर्भातील दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.
नागपूरची पूजा भारती आणि अमरावती येथील जुही मकेश्वर यांचा भारतीय संघात
समावेश करण्यात आला. विश्वचषकाचे आयोजन १५ तारखेपासून सुरू होत आहे.
यासाठी मंगळवारपासून दिल्लीत सराव शिबिर सुरू झाले. ते ११ जुलैपर्यंत
चालेल. पूजा आणि जुही या दोघीही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत सिनियर
राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू ठरल्या ह ोत्या. आशिया गटातून भारतीय
महिलांनी पहिल्यांदा विश्वचषकाची पात्रता मिळविली हे विशेष. (क्रीडा
प्रतिनिधी)

Web Title: Two Vidarbha players in the Indian squad