आयपीएलमध्ये २ नवीन संघ, २०१८ मध्ये CSK आणि RR चीही घरवापसी
By Admin | Updated: October 18, 2015 18:16 IST2015-10-18T16:29:09+5:302015-10-18T18:16:20+5:30
आयपीएलमधील आगामी पर्वात दोन नवीन संघांचा समावेश केले जाणार असून २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचीही आयपीएलमध्ये वापसी होणार आहे.

आयपीएलमध्ये २ नवीन संघ, २०१८ मध्ये CSK आणि RR चीही घरवापसी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - आयपीएलमधील आगामी पर्वात दोन नवीन संघांचा समावेश केले जाणार असून २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांचीही आयपीएलमध्ये वापसी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे आता आयपीएलमध्ये नेमके किती संघ खेळतील याविषयी उत्सुकता होती. यापार्श्वभूमीवर बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएलच्या भवितव्यावर चर्चा झाली. यात दोन नवीन संघाचा यंदाच्या पर्वात समावेश करण्याचा निर्णय झाला. तसेच पेप्सीने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर व्हिवो या मोबाईल कंपनीला आयपीएलचे प्रायोजकत्व देण्यात आले.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला बीसीसीआयने मोठा दिलासा असून या दोन्ही संघाना दोन वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये सहभागी होता येणार आहे.