आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची निविदा प्रक्रिया पूर्ण
By Admin | Updated: December 1, 2015 03:19 IST2015-12-01T03:19:31+5:302015-12-01T03:19:31+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील दोन सत्रांसाठी दोन नव्या संघांचा शोध घेण्याची निविदा प्रक्रिया सोमवारी बंद केली. हे दोन संघ चेन्नई

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची निविदा प्रक्रिया पूर्ण
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील दोन सत्रांसाठी दोन नव्या संघांचा शोध घेण्याची निविदा प्रक्रिया सोमवारी बंद केली. हे दोन संघ चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांचे स्थान घेणार आहेत. या दोन संघांना निलंबित करण्यात आले आहे.
आयपीएल २०१३ मध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीच्या अंतरिम अहवालानंतर बीसीसीआयच्या कार्य समितीने चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स यांच्या स्थानी दोन नवे संघ खेळविण्याचा निर्णय घेतला होता.
बीसीसीअयने १६ नोव्हेंबर रोजी निविदा नोटीस प्रकाशित केली. त्यात २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या फ्रॅन्चायझींच्या संचालन व व्यवस्थापन अधिकाराबाबत माहिती मागवली होती. निविदाअंतर्गत स्थानिक लीग सामने बीसीसीआयतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात येतील आणि अन्य अधिकारही मिळतील.
आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी निवदा नोटीस प्रकाशित होण्यापूर्वी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, आयपीएल संचालन परिषदेने फ्रॅन्चायझी स्थळांच्या यादीमध्ये जयपूर व कोचीला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्ला म्हणाले, ‘दोन नव्या संघांसाठी एकूण नऊ स्थळांची निवड करण्यात आली आहे. ८ डिसेंबर रोजी बोली प्रक्रिया होईल. रिव्हर्स बोलीसाठी मूळ किंमत ४० कोटी रुपये राहील.’