नंदुरबारमध्ये दोन गटांत हाणामारी, तीन जखमी
By Admin | Updated: August 28, 2014 23:09 IST2014-08-28T23:09:41+5:302014-08-28T23:09:41+5:30

नंदुरबारमध्ये दोन गटांत हाणामारी, तीन जखमी
>नंदुरबार : मोटरसायकलचा धक्का लागल्याने शहरात दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाल्या आहेत. दोन्ही गटांच्या लोकांनी हल्ला करताना लाठ्या, काठ्या, दगड, विटांचा वापर केला. त्यात तीन जण जखमी झाले. पोलीस सूत्रांनुसार, कसाई मोहल्ला भागातील परविनबानो शेख मोयद्दीन यांच्या फिर्यादीनुसार इस्माईलखान पठाण यांच्या लहान मुलाला मोटरसायकलचा धक्का लागला. त्यातून हाणामारी झाली. दोन्ही गटांतील कुणालाही अद्याप ताब्यात घेण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)