क्रीडा स्कूलमधील दोन मुलींनी घेतले विष
By Admin | Updated: October 8, 2015 04:22 IST2015-10-08T04:22:09+5:302015-10-08T04:22:09+5:30
येथील जीव्ही राजा क्रीडा स्कूलमधील १६ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी कथितरीत्या विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

क्रीडा स्कूलमधील दोन मुलींनी घेतले विष
तिरुअनंतपुरम : येथील जीव्ही राजा क्रीडा स्कूलमधील १६ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींनी कथितरीत्या विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दोन्ही मुलींना बुधवारी रात्री तिरुअनंतपुरमच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोघीही तिरुअनंतपुरम जिल्ह्यात
राहतात. स्कूलच्या प्राचार्यांनी
मात्र घटनेची माहिती देण्यास नकार दिला.
त्याआधी काल दुपारी कालपेट्टा येथील वेनाड जिल्हा क्रीडा परिषदेतील एका १७ वर्षांच्या प्रशिक्षणार्थी खेळाडूने आत्महत्या केली. त्याचे कोच आणि नातेवाईक त्याला ४ हजारांचा मोबाईल घेतल्याबद्दल रागावले होते.
याच वर्षी मे महिन्यात
अलापुझा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात एका १६ वर्षांच्या खेळाडू मुलीने विषारी फळ खाल्ले होते. या घटनेत तिला जीव गमवावा लागला.
(वृत्तसंस्था)