अव्वल दहामध्ये येण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: November 5, 2015 02:26 IST2015-11-05T02:26:37+5:302015-11-05T02:26:37+5:30

जागतिक बॅडमिंटनमधील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा - आश्विनी पोनप्पा यांनी या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये येण्याचा निर्धार केला आहे.

Trying to enter the top ten | अव्वल दहामध्ये येण्याचा प्रयत्न

अव्वल दहामध्ये येण्याचा प्रयत्न

मुंबई : जागतिक बॅडमिंटनमधील भारताची अव्वल जोडी ज्वाला गुट्टा - आश्विनी पोनप्पा यांनी या वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये येण्याचा निर्धार केला आहे. आगामी रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी माजी खेळाडूंनी एकत्रित येऊन तयार केलेल्या आॅलिम्पिक गोल्डक्वेस्ट (ओजीक्यू) योजनामध्ये या दोन्ही खेळाडूंचा नुकताच समावेश करण्यात आला. यावेळी ज्वाला - अश्विनी यांनी पुढील स्पर्धांच्या आपल्या तयारीविषयी सांगितले.
आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून सुपर सिरिज फायनल स्पर्धा महत्त्वाची आहे. कॅनडा ओपन नंतर आम्ही अव्वल दहामध्ये आलो होतो. मात्र नंतर जपान आणि कोरिया ओपनमध्ये आजारी पडल्याने माझ्या कामगिरीवर परिणाम झाला. त्यामुळे आमची क्रमवारी पुन्हा घसरली. पण आता आम्ही अव्वल दहामध्ये येऊन दुबईला होणाऱ्या सुपर सिरिज फायनल्ससाठी पात्र ठरण्याचे लक्ष्य बाळगले आहे, असे ज्वालाने सांगितले.
दिग्गज माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि दिग्गज माजी बिलियडर््स खेळाडू गीत सेठी यांनी स्थापन केलेल्या ओजीक्यूद्वारे रिओ आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत ज्वाला - अश्विनी यांना मदत मिळणार आहे. आॅलिम्पिक पदकासाठी आमच्यावर अनेकांच्या आशा आहेत. यासाठी आम्ही कसून कराव करीत असून आमची तयारी योग्यप्रकारे सुरु आहे. आम्हाला तंदुरुस्ती टिकवणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आम्ही आमच्या परीने पुर्ण प्रयत्न करीत आहोत, असे अश्विनीने सांगितले. ज्वाला - पोनप्पा या महिन्यात चायना ओपन (१० नोव्हेंबरपासून), हाँगकाँग ओपन (१७ नोव्हेंबरपासून) आणि मकाऊ ओपन (२४ नोव्हेंबरपासून) या स्पर्धांत विजेतेपदासाठी लढतील.
(क्रीडा प्रतिनिधी)

भारताचे बॅडमिंटन सध्या फॉर्ममध्ये...
सध्याचे भारतीय बॅडमिंटन सर्वोत्तम काळातून जात असल्याचे सांगितले. आॅलिम्पिक पदकाविषयी म्हणाल तर हे सर्वकाही त्यावेळी कामगिरी कशी होईल यावर अवलंबून आहे. आॅलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यामुळे प्रत्येकाचा खेळ त्या दिवशी कसा होतो यावर पदक ठरेल. ओलिम्पिकमध्ये खेळताना तुम्ही याआधी काय कामगिरी केली आहे याचा कोणी विचार करीत नाही.
- प्रकाश पदुकोण,
माजी बॅडमिंटनपटू

Web Title: Trying to enter the top ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.