पाकिस्तान संघ अडचणीत
By Admin | Updated: February 11, 2015 01:31 IST2015-02-11T01:31:59+5:302015-02-11T01:31:59+5:30
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल खानचा स्नायू दुखावला आहे़ त्यामुळे खेळाडूंच्या दुखापतीमुळे हैराण असलेला पाकिस्तान संघ पुन्हा अडचणीत सापडला आहे़

पाकिस्तान संघ अडचणीत
कराची : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल खानचा स्नायू दुखावला आहे़ त्यामुळे खेळाडूंच्या दुखापतीमुळे हैराण असलेला पाकिस्तान संघ पुन्हा अडचणीत सापडला आहे़
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला केवळ ६ षटकेच गोलंदाजी करता आली़ संघाच्या प्रवक्त्याने सांगितले, की डॉक्टरांनी सोहेल याला तीन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे़ त्याची दुखापत लवकरच बरी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली़ यापूर्वी वेगवान गोलंदाज जुनैद खान, मोहंमद हाफीज या अनुभवी खेळाडूंना दुखापतीमुळे वर्ल्डकपबाहेर व्हावे लागले आहे़ दरम्यान, सोहेल खानची दुखापत गंभीर झाली, तर त्याच्याऐवजी सोहेलला संघात जागा मिळू शकते.