हिरजच्या काशिनाथ नानगरला तिहेरी मुकुट
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:25+5:302014-10-03T22:56:25+5:30
उत्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये जि़ प़ प्राथमिक शाळा हिरजच्या काशिनाथ नानगरने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला़

हिरजच्या काशिनाथ नानगरला तिहेरी मुकुट
उ ्तर सोलापूर: अकोलेकाटी येथे झालेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये जि़ प़ प्राथमिक शाळा हिरजच्या काशिनाथ नानगरने तिहेरी मुकुटाचा मान मिळविला़17 वर्षे वयोगटात काशिनाथ नानगर 1500 मी़ धावणे, 5 कि़मी़ चालणे आणि 100 मी़ अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला़ 14 वर्षे वयोगटात स्वाती सदगर 600 मी़ व 80 मी़ अडथळा शर्यतीत द्वितीय आली़ 17 वर्षे वयोगटात 3 हजार मी़ धावणे स्पर्धेत निकिता वाघमोडे तर 1500 मी़ धावणे स्पर्धेत सानिका तडवळे हिने प्रथम क्रमांक पटकावला़ तसेच 17 वर्षे वयोगटात 1500 मी़ पायी चालणे व 3 हजार मी़ धावणे स्पर्धेत रेश्मा माळी द्वितीय आली़ गणेश राजमाने 80 मी़ अडथळा शर्यतीत प्रथम तर 600 मी़ धावणे स्पर्धेत तृतीय आला़या खेळाडूंना क्रीडाशिक्षक संजय सावंत, राम निकंबे, बापूसाहेब पाटील, गंगाधर कांबळे, शब्बीरपाशा अन्सारी, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदिछोडे, शहनाज सय्यद यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे सरपंच रावसाहेब होळकर, उपसरपंच शेवंता शिंदे, केंद्रप्रमुख शांतप्पा सदरखेड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष विकास सलवदे, मुख्याध्यापिका रार्जशी स्वामी यांनी कौतुक केल़ेफोटो ओळी-उत्तर सोलापूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळविलेल्या हिरज जि़ प़ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत रावसाहेब होळकर, शेवंता शिंदे, शांतप्पा सदरखेड, बाबुराव चव्हाण, विकास सलवदे, रार्जशी स्वामी, संजय सावंत, राम निकंबे, बापूसाहेब पाटील, गंगाधर कांबळे, शब्बीरपाशा अन्सारी, सोमनाथ चव्हाण, उषा पवार, कांचन बंदिछोडे, शहनाज सय्यद़