तिरंगी जोड
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:28+5:302015-01-23T23:06:28+5:30
ॲरोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एकाच षटकात तंबूचा मार्ग दाखविला.

तिरंगी जोड
ॲ ोन फिंच (३२) व शॉन मार्श (४५) यांनी सलामीला ७६ धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. सलामी जोडीपाठोपाठ कॅमरुन व्हाईट (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत सापडला. स्टिव्हन फिनने मार्श व व्हाईट यांना एकाच षटकात तंबूचा मार्ग दाखविला. कर्णधार म्हणून पदार्पणाच्या लढतीत शतक साकारणारा स्मिथ दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला. यापूर्वी मायकल हसीने असा पराक्रम केला होता. कसोटी व वन-डेमध्ये कर्णधार म्हणून पहिल्याच लढतीत शतकी खेळी करणारा स्मिथ जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला. स्मिथने ग्लेन मॅक्सवेलसोबत (३७) चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची, जेम्स फॉकनरसोबत (३५) पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची तर ब्रॅड हॅडिनसोबत (४२) सहाव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या क्षणी हॅडिन व मोएजेस हन्रिक्स (४) बाद झाल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली होती, पण दुसऱ्या टोकाला स्मिथ उभा असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित होता. स्मिथने ॲन्डरसनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत वैयक्तिक शतकाकडे वाटचाल केली. त्यानंतर ख्रिस व्होक्सच्या षटकात १ धाव घेत वन-डे क्रिकेट कारकीर्दीतील तिसरे शतक झळकाविले. इंग्लंडतर्फे मोईन अली, व्होक्स व फिन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. त्याआधी, कारकीर्दीतील चौथे वन-डे शतक झळकाविणाऱ्या बेलच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने दमदार मजल मारली. भारताविरुद्ध नाबाद ८८ धावांची खेळी करणाऱ्या बेलने आजच्या खेळीत १५ चौकार १ षटकार ठोकला. (वृत्तसंस्था)